शिक्षकाच्या घरात चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकाच्या घरात चोरी
शिक्षकाच्या घरात चोरी

शिक्षकाच्या घरात चोरी

sakal_logo
By

अडीच लाखांचा मुद्देमाल पळविला
कोल्हापूर : नवीन वाशी नाका परिसरात शिक्षकाच्या बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल पळविला. याबाबत शिक्षक अरुण साताप्पा कुंभार यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. काल सकाळी कुटुंबीय घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुंभार शनिवारी दुपारी घर बंद करून पत्नीसह कुरुकली (ता. कागल) मूळ गावातील घरी गेले होते. काल सकाळी परतल्यानंतर घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटल्याचे दिसले. तेव्हा घराच्या वरच्या मजल्यावरील लाकडी कपाटात ठेवलेले १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, २५ ग्रॅमचे गंठण, १० ग्रॅमचे टॉप्स, १५ ग्रॅमची सोन्याची चेन आणि ८० ग्रॅमचे चांदीचे दागिने असा सुमारे २ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. फिर्यादी कुंभार यांनी करवीर पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू असल्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले.