
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी दोन दिवस कॅम्प
प्रधानमंत्री आवास योजनेतील
लाभार्थ्यांसाठी दोन दिवस कॅम्प
कोल्हापूर, ता. ३१ : प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेअंतर्गत अद्याप बांधकाम परवानगी घेतलेली नाही, अशा लाभार्थ्यांकरिता महापालिकेने गुरुवार व शुक्रवारी (ता.९, १०) विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे. राजारामपुरीतील नगररचना कार्यालयात कॅम्प होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बांधकाम परवानगी घेऊन, त्वरित बांधकाम सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी परवानगी देऊन बांधकाम करण्यास सुलभ होण्यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या सूचनेनुसार कॅम्प घेतला आहे. ज्या लाभार्थ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, त्या घरांसाठी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात येणार आहे. कॅम्पमध्ये मिळकतपत्रक, मोजणी नकाशा, ले-आउट ऑर्डर-नकाशा, झोन दाखला व भाग नकाशा आदी कागदपत्रे आवश्यक आहे. मंजूर प्रकरणांच्या लाभार्थ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.