दि न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दि न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे कार्यक्रम
दि न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे कार्यक्रम

दि न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे कार्यक्रम

sakal_logo
By

79863
ज्या क्षेत्रात आवड तेच क्षेत्र निवडा
गोडबोले , दि न्यू एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन

कोल्हापूर, ता. १ : ‘‘विद्यार्थ्यांनी ज्या क्षेत्रात आवड असेल तेच क्षेत्र निवडावे,’’ असे स. म. लोहियाचे माजी विद्यार्थी सतीश गोडबोले यांनी सांगितले. दि न्यू एज्यूकेशन सोसायटीचा १०२ वा वर्धापन दिन पेटाळा क्रीडांगणावर झाला. गोडबोले, रविंद्र महादेवकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सर्व शाळांच्या एन.सी.सी., आर.एस.पी., स्काऊट, गर्ल गाईड ट्रुपने मानवंदना दिली.
गोडबोले म्हणाले, ‘‘माझा शैक्षणिक पाया संस्थेने मजबूत घडवल्याने उद्योग क्षेत्रात चांगली काम करु शकलो.’’ महादेवकर म्हणाले, ‘‘शाळेने माझे व्यक्तिमत्व घडवले. विद्यार्थी, पालकांनी बदलत्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा.’’
सुरुवातीला न्यू हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजेतर्फे मल्लखांब, रोप मल्लखांब, जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके सादर केली. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्टस् अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी रायफल शूटिंग, टेबल टेनिस, बॉक्सिंग, तायक्वाँदो, ज्यूदो, बुध्दिबळ प्रात्यक्षिके, विविध कला सादर केल्या.
उपाध्यक्ष नितीन वाडीकर यांनी स्वागत केले. सचिव प्रभाकर हेरवाडे यांनी आभार मानले. सहसचिव प्राचार्य एस. एस. चव्हाण यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे यादी वाचन केली. सागर बगाडे, महेश सूर्यवंशी, सौ. देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे अध्यक्ष पद्माकर सप्रे, नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया, अध्यक्ष निर्मल लोहिया, नेमचंद संघवी, प्रशांत लोहिया, कुशल सामाणी, संग्राम पाटील, सयाजी पाटील, प्रदीप पोवार, सौ. रुटा गोडबोले, सौ. उत्कर्षा पाटील, सौ. सुजाता लोहिया, सौ. अनिजा सूर्यवंशी, उमा भेंडीगिरी उपस्थित होते.
..............
चौकट
कर्णबधीर विद्यार्थ्यांनी जिंकली मने
वि. म. लोहिया कर्णबधीर विद्यालयातील मुलांनी सादर केलेल्या तानाजी मालुसरे यांच्या शौर्यावर आधारित कलाविष्काराने सर्वांचीच मने जिंकली. सामान्य मुलांनाही लाजवेल, अशा या आविष्काराने कार्यक्रमाची उंची आणखी वाढली.