यीन संवाद कार्यक्रम बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यीन संवाद कार्यक्रम बातमी
यीन संवाद कार्यक्रम बातमी

यीन संवाद कार्यक्रम बातमी

sakal_logo
By

(यीन लोगो वापरणे)
80444
कोल्हापूर : यिन संवाद उपक्रमात बोलताना प्रथमेश परब. सोबत अभिनेत्री मेघा शिंदे.

आजच्या संघर्षात उद्याचे यश
अभिनेता प्रथमेश परब; भारती विद्यापीठात यिन संवाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष असतोच. त्याचे स्वरूप वेगळे असते. मात्र आजच्या संघर्षात उद्याच्या यशाची भव्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात नेहमीच कार्यरत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते प्रथमेश परब यांनी केले. भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात ते बोलत होते. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) तर्फे आयोजित यिन संवाद कार्यक्रमात परब सहभागी झाले होते.
प्रशांत लाड यांनी प्रास्ताविक केले. या वेळी परब म्हणाले, ‘‘प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी संघर्ष करत असतो. आपला संघर्ष आपल्यालाच करावा लागतो, पण आजच्या संघर्षातच उद्याच्या यशाची भव्यता असते. त्यामुळे आपल्या समोर येणारे अडथळे पार करून कार्यरत रहा.’’ प्रसिद्ध अभिनेत्री मेघा शिंदे म्हणाल्या, ‘‘तारुण्यात अनेक गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. महाविद्यालयीन आयुष्यात आपल्या व्यक्तिमत्त्‍व विकासासाठी प्रयत्‍न‍ केले पाहिजेत. आपल्या करिअरवर लक्ष्य देऊन प्रयत्न करा.’’ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. राजेश कंठे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी अभिनेता अहमद शेख, यिन सहायक व्यवस्थापक अवधूत गायकवाड, प्रा. कीर्ती कदम, प्रा. अंजली गायकवाड, पृथ्वीराज पवार, इंद्रजित देसाई, प्रशांत लाड, यिन अध्यक्ष अथर्व चौगुले, उपाध्यक्ष सोहम गाडगीळ उपस्थित होते.