पांढरे पट्टे गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पांढरे पट्टे गायब
पांढरे पट्टे गायब

पांढरे पट्टे गायब

sakal_logo
By

स्पीडब्रेकरवरील
पांढरे पट्टे रात्रीत गायब!
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः दसरा चौकातून खानविलकर पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या मार्गावर तीन स्पीडब्रेकर आहेत. मात्र, एकाही स्पीडब्रेकरवर ओळखून येण्यासाठी पांढरे पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे याठिकाणी दररोज एकतरी अपघात ठरलेला असतो. काल येथे पुन्हा एक अपघात झाला. यानंतर रात्री महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धावत येऊन येथे पांढरे पट्टे मारले; पण रात्री मारलेले पट्टे सकाळी पुन्हा गायब झाले. याबाबत स्थानिक नागरिकांकडून पुन्हा संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.
बहुतांश शासकीय कार्यालयांत जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो. त्यामुळे हा रस्ता खूप रहदारीचा आहे. मात्र, स्पीडब्रेकर दिसून येत नसल्याने त्यांना गाडीवर ताबा मिळवणे अवघड जाते आणि अपघात होतात. याबाबत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, ‘‘वारंवार अपघात होत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात ऑईलपेंटचे पट्टे येथे मारले आहेत; पण लवकरच थर्मोप्लास्टचे पट्टे मारले जाणार आहेत.’’