आसमा चषक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आसमा चषक
आसमा चषक

आसमा चषक

sakal_logo
By

11920
कोल्हापूर : आसमा चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्‌घा‍टनप्रसंगी ‘आसमा’चे पदाधिकारी, खेळाडू व मान्यवर.

आसमा चषक क्रिकेट
स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
‘सकाळ’, ‘आसमा’चे संघ पुढील फेरीत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : शास्त्रीनगर क्रिकेट ग्राउंडवर ॲड एजन्सीज व मीडिया असोसिएशन आयोजित आसमा चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून उत्साहात प्रारंभ झाला. कोल्हापुरातील सर्व दैनिके, इलेक्ट्रॉनिक मीडिया व मुद्रक संघ अशा एकत्रित आठ संघांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे उद्‍घाटन काका पाटील, ‘आसमा’चे अध्यक्ष सुनील बासरणी, ‘सकाळ’चे सह उपसरव्यवस्थापक आनंद शेळके, आसमा चषक कमिटी चेअरमन मनीष राजगोळकर यांच्या उपस्थितीत झाले.
स्पर्धेत ‘सकाळ’, ‘पुढारी’, ‘लोकमत’, ‘तरुण भारत’, ‘पुण्यनगरी’, मुद्रक संघ, सर्व माध्यमांचे प्रतिनिधी व ‘आसमा’ असे आठ संघ सहभागी झाले आहेत.
‘पुण्यनगरी’ आणि मुद्रक संघात आज झालेल्या सामन्यात मुद्रक संघ तर ‘पुढारी’ व ‘आसमा’ संघातील सामन्यात ‘पुढारी’ संघाने विजय मिळवला. ‘सकाळ’ व ‘तरुण भारत’ संघातील सामन्यात ‘सकाळ’ने, तर सर्व माध्यम प्रतिनिधी व ‘लोकमत’ संघातील सामन्यात सर्व माध्यम प्रतिनिधी संघाने विजय मिळवला. पाचवा सामना ‘आसमा’ व मुद्रक संघात झाला. त्यात ‘आसमा’ने विजय मिळवला. यंदा तृणधान्य अर्थात मिलेट वर्ष केंद्र सरकारने घोषित केले गेले असून त्यावर आधारित मिलेट कट अशी थीम या स्पर्धेसाठी आहे. उद्या (रविवारी) सायंकाळी स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून तत्पूर्वी उपांत्यपूर्व तसेच उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. स्पर्धा पाहण्यासाठी मोफत असून क्रिकेट प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष सुनील बासरानी यांनी केले आहे.