
दीक्षांत समारंभ १६ फेब्रुवारीला
80511
...
शिवाजी विद्यापीठाचा
दीक्षान्त समारंभ १६ रोजी
राज्यपाल कोश्यारींसह विनय सहस्त्रबुद्धे यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ गुरुवारी, १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या समारंभाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक आज झाली. यामध्ये व्यवस्थापन परिषदेवरील नूतन सदस्य उपस्थित होते. बैठकीत दीक्षान्त समारंभ गुरुवारी (ता. १६) घेण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच या समारंभात किती विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र द्यायचे, याचाही निर्णय झाला. राज्यपाल कोश्यारी यांच्यासह डॉ. सहस्त्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला असणार आहे. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे राज्यसभेचे माजी खासदार असून इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते ज्येष्ठ राजकीय विचारवंत असून भारताची सौम्य संपदा (सॉफ्ट पॉवर) याबद्दलची मांडणी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर केली आहे. व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.