
प्रवेश परीक्षेसाठी आत्मविश्वास हवा
gad61.jpg
80767
गडहिंग्लज : आर. आर. ॲकॅडमीतर्फे प्रवेश परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव झाला. या वेळी सूरज पाटील, प्रा. एच. रेड्डी, सूरज पाटील आदी उपस्थित होते.
------------------------------------------------------
प्रवेश परीक्षेसाठी आत्मविश्वास हवा
सूरज पाटील : ‘आर. आर.’ मध्ये पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : भविष्यात वैज्ञानिक, डॉक्टर, इंजिनिअर, एन.डी.ए. यांना विशेष मागणी असणार आहे. कोणतीही प्रवेश परीक्षा द्यायची असेल तर आत्मविश्वासच महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन कऱ्हाड येथील सूरज पाटील यांनी केले.
येथील आर. आर. ॲकॅडमीतर्फे दहावी विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या जेईई, नीटसाठी अकरावी प्रवेश परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. ॲकॅडमीचे संचालक प्रा. एच. रेड्डी अध्यक्षस्थानी होते. या प्रवेश परीक्षेत ७० शाळेतील १५०० विद्यार्थी बसले होते. मराठी व सीबीएसई माध्यमातून प्रथम आलेल्या प्रत्येकी १० विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, चषक व शिष्यवृत्ती देऊन गौरवले.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘अकरावी व बारावी ही दोन वर्षे करिअर घडवण्यासाठी महत्त्वाची आहेत. जीवनात जगण्यासाठी जो मार्ग निवडला जाईल त्यात कामाचा मोबदला आणि निर्भेळ आनंद मिळवणे म्हणजे करिअर होय.’’ प्रा. एच. रेड्डी म्हणाले, ‘‘नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान पाच तालुक्यांतील १७० शाळांना भेट देवून अकरावी जेईई, नीट प्रवेशाचे महत्त्व सांगितले. सर्वच शाळांचा चांगला प्रतिसाद राहिला. या भागात ग्रामीण शैक्षणिक वातावरण चांगले आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश निश्चित मिळते. ॲकॅडमीत विविध प्रवेश परीक्षांची तयारी भक्कमपणे करून घेतली जाते.’’
ॲकॅडमीच्या समन्वयिका मंजिरी देशपांडे यांनी गतिमान जीवनात विद्यार्थ्यांना सक्षम व आदर्श शिक्षण मिळवायचे असेल तर ॲकॅडमीतील शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. नाथा रेगडे यांनी सूत्रसंचालन केले. श्वेता दड्डी यांनी आभार मानले.