चंदगड वर्धापनदिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड वर्धापनदिन साजरा
चंदगड वर्धापनदिन साजरा

चंदगड वर्धापनदिन साजरा

sakal_logo
By

80834

चंदगड : ‘सकाळ’ संपर्क कार्यालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना आमदार राजेश पाटील. शेजारी नगराध्यक्षा प्राची काणेकर, ओलमचे बिझनेस हेड भरत कुंडल, ‘सकाळ’चे वृत्त संपादक तानाजी पोवार, बातमीदार सुनील कोंडुसकर. (छायाचित्र : सुरेश बागिलगेकर, चंदगड)
---------

‘सकाळ’ने सडेतोडपणा, विश्वासार्हतेची प्रतिमा जोपासली

आमदार राजेश पाटील : सकाळ चंदगड कार्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ६ ः सडेतोडपणा आणि विश्वासार्हता या गुणावर ‘सकाळ’ने चंदगडसारख्या दुर्गम भागातसुद्धा आपली प्रतिमा जोपासली असल्याचे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले. येथील ‘सकाळ’ संपर्क कार्यालयाच्या २१ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्षा प्राची काणेकर, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
‘सकाळ’चे तालुका प्रतिनिधी सुनील कोंडुसकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ‘सकाळ’ने चंदगड तालुक्याच्या विकासात वेळोवेळी घेतली भूमिका आणि त्याला शासनदरबारी मिळालेले यश याचा आढावा घेतला.
आमदार पाटील म्हणाले, ‘‘सकाळने दरवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या पुरवण्यासुद्धा विकासाला दिशा देणाऱ्या आहेत. यावेळची जैवविविधता ही पुरवणीसुद्धा अत्यंत दर्जेदार आहे. त्यातून या विभागाची नैसर्गिक संपदा विषद करण्यात आली असून ती जोपासणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.’’ येथील निसर्गसंपदेचा वापर पर्यटनासाठी व्हावा यासाठी राधानगरीच्या धर्तीवर तिलारीनगर भागात अभयारण्य स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
‘सकाळ’चे वृत्त संपादक तानाजी पोवार म्हणाले, ‘‘सकाळने नेहमीच सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून काम केले आहे. जे समाजाच्या हिताचे त्यालाच प्राधान्य दिले आहे.’’ नगराध्यक्षा काणेकर, ओलम कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनीही मनोगत व्यक्त केली. या वेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील, मल्लिकार्जून वाटंगी, बाबूराव हळदणकर, शिवानंद हुंबरवाडी, अली मुल्ला, सुधीर देशपांडे, अभय देसाई, सचिन बल्लाळ, दयानंद काणेकर, प्रा. एन. एस. पाटील, प्रा. आर. पी. पाटील, माजी प्राचार्य डॉ. ए. एस. जांभळे, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, एस. व्ही. गुरबे यांच्यासह शेती, शिक्षण, सहकार, उद्योग आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘सकाळ’चे व्यवस्थापक (जाहिरात) नंदकुमार दिवटे, सहायक व्यवस्थापक (जाहिरात) अरुण भोगले, अशोक पाटील, रणजित कालेकर, अजित माद्याळे, अवधूत पाटील, प्रवीण आडसुळे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. अशोक पाटील यांनी आभार मानले.
....

कात्रणांचे प्रदर्शन, रांगोळी आकर्षण.......

‘सकाळ’च्या वर्धापनदिनानिमित्त पाटणे (ता. चंदगड) येथील वसंत सोनार यांनी ‘सकाळ’मधील विविध कात्रणांतून तयार केलेल्या साहित्याचे प्रदर्शन मांडले होते. त्याशिवाय र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी रेखाटलेली संस्कारभारती रांगोळी उपस्थितांचे आकर्षण ठरली.