Wed, March 29, 2023

घरफाळा सवलत नको
घरफाळा सवलत नको
Published on : 6 February 2023, 3:47 am
घरफाळा थकबाकी
दंड व्याजातसूट देऊ नये
महापालिका प्रशासकांना निवेदन
कोल्हापूर, ता. ६ ः घरफाळा थकबाकी दंड व्याजात कोणतीही सूट दिल्यास प्रामाणिक कर भरणाऱ्यांवर अन्याय होणार आहे. या प्रामाणिक करदात्यांनी ५२ कोटी रूपये जमा केले आहेत. सवलत दिल्यास थकबाकीत सूट मिळते म्हणून जाणूनबुजून घरफाळा थकीत ठेवतील असे निवेदन दिलीप पाटील यांनी प्रशासकांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, ही सूट सामान्य करदात्याला नव्हे मोठ्या मिळकती व भाडेकरू वापर असणाऱ्या मिळकतींना मिळणार आहे. मोठ्यांच्या थकबाकीला विभागातील अधिकारी, कर्मचारी, मिळकतदार जबाबदार आहेत. सामान्य करदातांनी ६, ४, २ टक्के सवलतीत बावन्न कोटी जमा केले आहेत. त्यांनी १०० टक्के सुटीची वाट न पाहता फेब्रुवारी अखेर कर भरला आहे. आता कोणतीही सूट दिल्यास प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांवर अन्याय होणार आहे.