आयएचओ पुरस्कार वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयएचओ पुरस्कार वितरण
आयएचओ पुरस्कार वितरण

आयएचओ पुरस्कार वितरण

sakal_logo
By

80963
‘आयएचओ’तर्फे सोशल
इम्पॅक्ट ॲवॉर्डचे वितरण
कोल्हापूर ः आयएचओ सोशल फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सोशल इम्पॅक्ट ॲवॉर्डने सन्मान झाला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, आरपी ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा एड्‍स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या समन्वयक दीपा शिपूरकर, सर्पमित्र धनंजय नामजोशी, रक्तदान चळवळीतील प्रकाश घुंगुरकर, ‘एलजीबीटीक्यू’ वर्गासाठी लढा उभारणारे विशाल पिंजाणी, फुटबॉलपटू निखिल कदम, समुपदेशक प्रियांका पवार, रिंगण फिटनेस फाउंडेशन, उद्योजक दादू सलगर, स्टार्टअप क्षेत्रातील अंजोरी परांडेकर- कुंभोजे, प्लेटलेटस डोनेशन चळवळीतील धनंजय पडळकर, मुलींच्या छेडछाडीविरोधात काम करणारे प्रथम पाटील, पर्यावरण क्षेत्रातील अर्चित कुलकर्णी, रक्तदान चळवळीतील रोहित देसाई, फिजिओथेरपी क्षेत्रातील डॉ. कृष्णा काळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन काटकर
यांचा कार्यक्रमात सन्मान झाला. गुडविल ॲम्बेसिडर ऑफ इंडिया प्लेटलेटस डोनेशन विश्वजित काशीद, ओपेक्स एक्सेलरेटरचे संस्थापक सचिन कुंभोजे, ‘आयएचओ’चे संस्थापक डॉ. ऋषीकेश पोळ आदी उपस्थित होते.