
शिवसेना निवेदन
80838
...
विशाळगडावरील अतिक्रमण तत्काळ काढा
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर, ता. ६ : महाशिवरात्रीला विशाळगड अतिक्रमणमुक्त करत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले होते. त्यानुसार हा गड तत्काळ अतिक्रमणमुक्त झाला पाहिजे. महाशिवरात्रीला अतिक्रमण काढले नाही तर शनिवारी (ता. १८) शिवसेनेच्या वतीने विशाळगडावर जनआंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, विशाळगडावर अतिक्रमण काढावे यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे. पुरातत्त्व खात्याने विशाळगडावरील अतिक्रमण काढावे यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. अतिक्रमण काढण्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाले आहेत. त्यानुसार तातडीने याचे नियोजन करुन अतिक्रमणे काढली जावीत. गडावरील चुकीच्या पद्धतीने सुरू असणारे व्यवसायही बंद केले पाहिजेत.
...