दलितमित्र व्यंकाप्पा भोसले वाढदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दलितमित्र व्यंकाप्पा भोसले वाढदिवस
दलितमित्र व्यंकाप्पा भोसले वाढदिवस

दलितमित्र व्यंकाप्पा भोसले वाढदिवस

sakal_logo
By

दलितमित्र व्यंकाप्पा भोसले
वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

कोल्हापूर, ता. ६ ः प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम झाले. व्याख्यानमाला, खाद्य महोत्सव, ग्रंथ प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा आदी उपक्रमांचा त्यामध्ये समावेश होता.
आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत व्यंकाप्पा भोसले यांनी बालकल्याण संकुल संस्थेला पंचवीस हजार, वात्सल्य फाउंडेशनला पंचवीस हजार, भटका व विमुक्त समाज विकास मंडळाला पंचवीस हजार, दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालयाला पाच हजार असे एकूण ऐंशी हजारांची देणगी दिली.
भोसले यांनी आयुष्यभर उपेक्षित, वंचित घटकांसाठी संघर्ष करून या वर्गाला न्याय मिळवून दिल्याचे गौरवोद्गार आमदार आसगावकर यांनी काढले. महात्मा गांधी यांच्याच विचाराने देश चालला पाहिजे, अशी अपेक्षा भोसले यांनी व्यक्त केली. उद्योजक एम. बी. शेख, बजरंग राणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, पोलिस निरीक्षक मीरा बाबर, संजय पवार उपस्थित होते. उमेश सूर्यवंशी, प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर, डॉ. विकास विधाते यांची व्याख्याने झाली. विक्रांत पाटील, प्रकाश पाटील, योजना किडगावकर, प्रा. सुनील भोसले, शिल्पा भोसले, कविता कळके, रघुनाथ कांबळे आदी उपस्थित होते. शिवाजी कोरवी यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश वर्पे यांनी सूत्रसंचालन केले. स्वाती थोरात यांनी आभार मानले.