केदारी रेडेकर आयुर्वेदिकला विजेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केदारी रेडेकर आयुर्वेदिकला विजेतेपद
केदारी रेडेकर आयुर्वेदिकला विजेतेपद

केदारी रेडेकर आयुर्वेदिकला विजेतेपद

sakal_logo
By

केदारी रेडेकर आयुर्वेदिकला विजेतेपद
गडहिंग्लज : येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक रुग्णालयाच्या संघाने क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. गडहिंग्लज मेडिकल असोसिएशनतर्फे खुल्या क्रिकेट स्पर्धा झाल्या. शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत विविध रुग्णालये व केमिस्टचे संघ सहभागी झाले होते. डॉ. अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखालील या संघात डॉ. शैलेश सावंत, अनिरुद्ध रेडेकर, डॉ. नीलेश राजमाने, डॉ. स्वप्नील चव्हाण, डॉ. शुभम पाटील, डॉ. आशिष घाडी, डॉ. ऋषिकेश गुरव, डॉ. श्रीधर बेली, डॉ. शिवम चोपणे, डॉ. गजानन सांगळे, डॉ. निखिल शिंदे यांचा समावेश होता. डॉ. उदय कोळी यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. संस्थेच्या अध्यक्षा अंजना रेडेकर, सचिव प्रा. सुनील शिंत्रे, प्राचार्या डॉ. वीणा कंठी, उपप्राचार्य डॉ. पंकज विश्वकर्मा यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
---------------------------
‘साधना’च्या माजी विद्यार्थ्यांचे दातृत्व
गडहिंग्लज : येथील साधना प्रशालेच्या १९९७-९८ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला वॉटर फिल्टर भेट दिले. त्यांनी दाखवलेल्या दातृत्वाचे कौतुक होत आहे. माजी विद्यार्थी डॉ. रणजित कदम, सुरेश खोराटे, वीरेंद्र कित्तूरकर, मलगोंडा पाटील, मलगोंडा गुडदे, किरण पाटील, नरेंद्र वाळकी, भूषण साबळे, रॉबर्ट बारदेस्कर, साधना शिप्पुरे, निलोफर शेख, दिलीप आडसुळे, रोहिणी कोरी यांनी शाळेशी असलेले ऋणानुबंध जोपासले. पर्यवेक्षक रफिक पटेल यांनी प्रास्ताविक केले. संचालक अरविंद बारदेस्कर, प्राचार्य जी. एस. शिंदे आदी उपस्थित होते. संजय घोडके यांनी आभार मानले.
---------------------------
‘व्यापारी नागरी’ला बँको पुरस्कार
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला २०२१-२२ चा बँको पुरस्कार जाहीर झाला. अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो. संस्थेची ५० ते ७५ कोटी गटातून या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. १५ मार्चला महाबळेश्वर येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. संस्थेचे ३१ जानेवारीअखेर दोन कोटी १९ लाख रुपये भागभांडवल आहे. ५२ कोटी ६३ लाख रुपयांच्या ठेवी असून, ३६ कोटी ८० लाखांचे कर्जवाटप झाले आहे. संस्थेचा सातत्याने अ ऑडिट वर्ग आहे. नेट एनपीए शून्य टक्के आहे. येथील प्रधान कार्यालयासह कोल्हापूर व आजरा येथे शाखा कार्यरत आहेत.
-------------------------------
GAD71.JPG
80986
गडहिंग्लज : घाळी महाविद्यालयात सीए फौंडेशन परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. मंगलकुमार पाटील, गजेंद्र बंदी, प्रा. अनिल उंदरे उपस्थित होते.

‘घाळी’च्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या नऊ विद्यार्थ्यांनी सीए फौंडेशन परीक्षेत यश मिळवले. प्रांजल शिंत्रे, सानिका शिंदे, सुमित कामत, साक्षी घोरपडे, पियुशा पाटील, शिवानी माने, सृष्टी कुलकर्णी, सानिका घबाडे, राजलक्ष्मी रोडगी यांचा समावेश आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही परीक्षा घेतली होती. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. अनिल उंदरे, डॉ. नागेश मासाळ, सहसचिव गजेंद्र बंदी, अधीक्षक हरिभाऊ पन्हाळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार केला. डॉ. मनोहर पुजारी, प्रा. सचिन जानवेकर, डॉ. दत्तात्रय वाघमारे, प्रा. प्रमोद पुजारी, प्रा. पूजा पाटील, प्रा. राजश्री म्हंकावे यांचे मार्गदर्शन मिळाले.
--------------------------------
GAD72.JPG :
80987
पूजा माळगी

पूजा माळगी विद्यापीठात प्रथम
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूजा माळगीने शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला. वाणिज्य विभागाच्या दुसऱ्या वर्षाच्या मॅनेजमेंट अकौंटिंग विषयात तिने यश मिळवले. विद्यापीठामार्फत दिला जाणारा दि अनवेशक प्राईज हा पुरस्कार व रोख पाच हजार रुपये देऊन तिचा गौरव केला. कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांचे प्रोत्साहन, तर विभागप्रमुख डॉ. मनोहर पुजारी, प्रा. सचिन जानवेकर, प्रा. महेश वंडकर, प्रा. प्रमोद पुजारी, प्रा. राजश्री म्हंकावे यांचे मार्गदर्शन लाभले.