संजय भोसले पदावनत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय भोसले पदावनत
संजय भोसले पदावनत

संजय भोसले पदावनत

sakal_logo
By

भोसले यांच्यावर पदावनतीची
कारवाई करावीः भूपाल शेटे

कोल्हापूर, ता. ७ ः महापालिकेतील अधीक्षक पदावर करण्यात आलेली समायोजन प्रक्रिया रद्द करून केएमटीत कनिष्ठ लिपिक या मूळ पदावर पदावनत करण्याबाबतच्या प्रक्रियेला संजय भोसले यांनी मिळवलेली मनाई जिल्हा न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे प्रशासकांना अधिकार असल्याने पदावनतीचे आदेश काढून अपील कालावधी पूर्ण होताच त्याची प्रक्रिया राबवावी. उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करावे, असे माजी उपमहापौर भूपाल शेटे व चंद्रकांत रामाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शेटे म्हणाले, ‘केएमटीत अकौंट पदावर नियुक्ती नसताना, शैक्षणिक अर्हता नसताना भोसले यांना महापालिकेत अधीक्षक पदावर सामावून घेतले. याबाबत आम्ही आयुक्तांकडे लेखी तक्रार व पुरावे सादर केले होते. त्यानुसार नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केएमटीत मूळ पदावर पदावनत का करू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याला भोसले यांनी आव्हान दिले होते व मनाई मिळवली होती. ती मनाई उठवण्याबाबत महापालिका प्रशासनाने जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी होऊन जिल्हा न्यायालय वर्ग ४ यांनी मनाई उठवली. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासकांनी भोसले यांच्यावर पदावनतीची कारवाई करावी. त्यासाठी कॅव्हेट दाखल करावे. तसेच भोसले यांनी महापालिकेत घेतलेल्या विविध पदांचा संपूर्ण पगार, वाहनांचा खर्च वसूल करावा.’’ याबाबत संपर्क साधला असता संजय भोसले यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.