राज्यपाल कोश्‍यारी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे शनिवारी जेलभरो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपाल कोश्‍यारी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे शनिवारी जेलभरो
राज्यपाल कोश्‍यारी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे शनिवारी जेलभरो

राज्यपाल कोश्‍यारी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे शनिवारी जेलभरो

sakal_logo
By

फोटो (KOP23L81070)
...........................

राज्यपालांविरोधात ठाकरे गटाचे शनिवारी ‘जेलभरो’

कुलगुरूंना निवेदन ः माफी मागावी, अन्यथा दीक्षांत समारंभावेळी निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवाजी विद्यापीठाने दीक्षांत समारंभासाठी निमंत्रित केले आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. ११) दुपारी १२ वाजता विद्यापीठाच्या प्रवेशद्वारात जेलभरो आंदोलन करण्यात येईल. कोल्हापुरात येण्यापूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा १६ फेब्रुवारी रोजी दीक्षांत समारंभस्थळी उग्र निदर्शने केली जातील, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज दिला.
पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी त्याबाबतचे निवेदन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना दिले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते. वारंवार आणि जाणीवपूर्वक राज्यपाल कोश्यारी हे छत्रपती शिवरायांबद्दल अनुद्‌गार काढतात, वादग्रस्त वक्तव्य करतात. कोल्हापुरात शिवरायांच्या नावाने असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास त्यांना निमंत्रित करून विद्यापीठ प्रशासनाने कोल्हापूरच्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ते जनता कदापि सहन करणार नाही. त्यामुळे कोल्हापुरात येण्यापूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी माफी मागावी. त्यांच्या विरोधातील आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शनिवारी जेलभरो करण्यात येणार असल्याचे पवार आणि देवणे यांनी सांगितले. त्यावर आपल्या भावना, मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात येतील, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.
यावेळी रविकिरण इंगवले, मंजित माने, चंद्रकांत पाटील, लतीफ शेख, कमलाकर जगदाळे, पूनम फडतरे, राजेंद्र पाटील, अवधूत साळोखे, शशिकांत बिडकर, राजू जाधव आदी उपस्थित होते.