इचल : महापालिकेला निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : महापालिकेला निवेदन
इचल : महापालिकेला निवेदन

इचल : महापालिकेला निवेदन

sakal_logo
By

ich710.jpg
81126
इचलकरंजी ; रेणुकानगर झोपडपट्टीतील नागरी सुविधाप्रश्नी उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना माकपतर्फे निवेदन दिले.
--------------

रेणुकानगर झोपडपट्टीत अस्वच्छता
माकपचे मनपाला निवेदन; पाणीप्रश्न गंभीर असल्याची तक्रार

इचलकरंजी, ता. ७ ः रेणूकानगर झोपडपट्टी परिसरात स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून परिसरात रोगराई पसरण्याची भिती असल्यांने या परिसरात स्वच्छता करावी, अशी मागणी आज माकपच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन महापालिका उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना शिष्टमंडळाने दिले. कांही विघ्नसंतोषी लोक नाहक तक्रारी करीत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून झोपडपट्टीतील नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. हा त्रास देणे थांबवावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी शिष्टमंडळांने दिला.
झोपडपट्टी पुनर्वसनाचा न्यायालयीन वाद सुरु आहे. या परिसरात सध्या नागरी सुविधांचा अभाव आहे. पाणी प्रश्नामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाणी साठवणूक केल्यानंतर महापालिकेकडून अतिक्रमणाच्या नावाखाली कारवाई करण्यात येत आहे. कूपनलिका खोदाईला विरोध केला जात आहे. शुध्द पेयजल प्रकल्पाला विरोध करण्यात आला. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न तयार होत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देतेवेळी दत्ता माने, भाऊसाहेब कसबे, सदा मलाबादे, अंबादास कुणगिरी, शंकर धुळम, अंबादास रामदीन, पांडुरंग येशाल, अंजना साळुंखे, रेखा फुलमारी, झाकीर जमादार, तानाजी दीडवळ, नारायण यरगुंटला, महादेवी सुतार, रतन बनसोडे उपस्थित होते.