गांधीनगर कचरा डेपोची माहिती सादर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधीनगर कचरा डेपोची माहिती सादर करा
गांधीनगर कचरा डेपोची माहिती सादर करा

गांधीनगर कचरा डेपोची माहिती सादर करा

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

गांधीनगरातील कचऱ्या‍बाबत कारवाई करणार

उपमुख्य कार्यकारी अरुण जाधव यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ७ : गांधीनगर (ता.करवीर) येथील कचऱ्या‍चा प्रश्‍‍न गंभीर आहे. या कचऱ्या‍च्या ढिगावर तीन शिफ्‍टमध्ये प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच हा कचरा कमी करण्यासाठी गट विकास अधिकारी, तसेच ग्रामपंचायतीलाही सूचना दिल्या जातील. दिलेल्या वेळेत कचऱ्या‍वर प्रक्रिया केली नाहीतर कारवाई केली जाईल, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी दिली. ‘सकाळ’मध्ये प्रसि‍द्ध झालेल्या रिपोर्ताजनंतर श्री.जाधव यांनी या विषयाची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गांधीनगर येथे कचऱ्या‍चे डोंगर तयार झाले आहेत. या ठिकाणी सीसीटीव्‍ही बसवण्यासह, आहे त्या कचऱ्या‍वर तीन शिफ्‍टमध्ये प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत ‘सकाळ’ने रिपोर्ताज प्रसिध्‍द करत कचरा डेपो परिसरातील वास्‍तव मांडले. याची दखल घेत श्री. जाधव यांनी कचऱ्या‍चा प्रश्‍‍न मार्गी लावण्यासाठी कंबर कसली आहे. गांधीनगरसह परिसरातील चार गावांतून कचरा संकलन करून कचरा डेपोत टाकला जातो. येथे वर्षोनुवर्षे कचऱ्या‍चे ढीग पडून आहेत. या सर्व कचऱ्या‍वर प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्‍न करणार असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.

ागावातून जमा होणाऱ्‍या कचऱ्‍यावरही नियंत्रण आणणे आवश्यक आहे. यासाठी दुकानांची संख्या, तेथून निघणारा कचरा याची प्रत्यक्ष पाहणी करणे, तपासणी करणे, प्लास्‍टिकच्या कचरा निर्मितीची माहिती घेण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. वेळ पडली तर असा प्लास्‍टिक कचरा करणाऱ्यां‍वर कारवाई करण्यासाठी जिल्‍ह्यातील इतर ग्रामपंचायतींचे कर्मचारीही नेमले जातील, अशी माहिती श्री. जाधव यांनी दिली.