शिक्षकाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकाची आत्महत्या
शिक्षकाची आत्महत्या

शिक्षकाची आत्महत्या

sakal_logo
By

81223
संदीप सुतार
------

दुंडगे येथे शिक्षकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप किरण सुतार (वय २८) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आज (ता. ७) दीडच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. सुतार हे गडहिंग्लजच्या एका खासगी प्रशालेत शिक्षक म्हणून काम करत होते.
पोलिसांनी सांगितले की, सुतार कुटुंबीय सोलापूरकडे जाणाऱ्या‍ पाणंद रस्त्यावरील सुतार वसाहतीमध्ये राहते. घरामागे त्यांची शेती आहे. खासगी प्रशालेत शिक्षकाचे काम करत असतानाच ते गावात फोटोग्राफीचाही व्यवसाय करीत असत. दरम्यान, आज दुपारी दीडच्या सुमारास शेतातील एका झाडाला गळफास लावून घेतल्याच्या अवस्थेत ते आढळून आले. ही घटना पाहणाऱ्यां‍नी नातेवाईकांना याची कल्पना दिली आणि लगेचच सुतार यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यां‍नी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी, ७ महिन्यांची मुलगी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.