अमित शहा दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित शहा दौरा
अमित शहा दौरा

अमित शहा दौरा

sakal_logo
By

00653
अमित शहा
१९ ला कोल्हापुरात
कोल्हापूर, ता. ७ ः केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा १९ फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्‍थितीत त्यादिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत.
दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत श्री. शहा यांच्या दौऱ्याच्या पूर्व तयारीची बैठक उद्या (ता. ८) पेटाळा येथील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात होणार आहे. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला शहा उपस्थित रहाणार आहेत. त्यानंतर ते, अंबाबाई मंदिर व शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत. दुपारी त्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयासाठी घेतलेल्या नागाळा पार्क (राजहंस प्रिंटिंग प्रेसच्या समोरील) येथील नव्या जागेत मंदिर बांधकामाचा प्रारंभ होणार आहे. तेथेच पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावाही होणार आहे. सायंकाळी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे आयोजित लोकप्रवास योजनेंतर्गत होणाऱ्या मेळाव्याला ते उपस्थित राहाणार आहेत. दरम्यान, श्री. शहा यांचे कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणांची पाहणी मंत्री चंद्रकांत पाटील करतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकही आहे.