कोल्हापुरातील युवकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरातील युवकाचा मृत्यू
कोल्हापुरातील युवकाचा मृत्यू

कोल्हापुरातील युवकाचा मृत्यू

sakal_logo
By

81234
फोंडा ः येथे सोमवारी झालेल्या अपघातात कोल्हापूरचा युवक ठार झाला.

फोंड्यातील अपघातात
कोल्हापूरचा युवक ठार
फोंडा (गोवा), ता. ७ : फर्मागुडी - फोंडा येथे दुचाकीने ओव्हरटेक करताना अंदाज चुकल्यामुळे मोटारीचा धक्का लागून रस्त्यावर पडलेल्या कोल्हापुरातील युवकाला भरधाव टँकरने चिरडले. आज सकाळी हा भीषण अपघात झाला. संदीप नारायण परबकर (वय ३७, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः फर्मागुडी येथे तीन वाहनांमध्ये आज सकाळी साडेआठच्या सुमारास अपघात झाला. संदीप कामानिमित्त फोंड्यात राहात होते. ते सकाळी मोटारसायकल (एमएच ०९-डीसी ५६२९) वरून कुर्टी - फोंड्याहून कुंडईला कामाला निघाले होते. फोंड्याहून पणजीकडे निघालेल्या मोटारीला (जीए०५ -बी ७१०६) ओव्हरटेक करताना निसटता धक्का बसला. या धक्क्यानिशी संदीप रस्त्यावर फेकले गेले. नेमका त्याचवेळेला फोंड्याच्या दिशेने येणाऱ्या टँकरखाली (जीए०५ - टी ५३९८) सापडल्याने तो जागीच ठार झाला. मोटारीला मागे टाकून पुढे जाण्याच्या अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फोंडा पोलिसांनी पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवला.

कर्ता हरपल्याने कुटुंबावर आभाळ
संदीप परबकर मूळचा कोल्हापूर येथील असला तरी आमराई - कुर्टी येथे भाडेतत्त्वावरील खोलीत राहात होता. कुंडई औद्योगिक वसाहतीतील ‘झायडस’ या कंपनीत तो दहा वर्षांपूर्वी कामाला लागला होता. त्याच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. कमावत्या संदीपचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. कोल्हापूरहून त्याचे कुटुंबीय फोंड्यात दाखल झाले.