
अँड पी आर बाणावलीकर हरपले
81240
वकिलीतील आदर्श व्यक्तिमत्व हरपले
वकिलांच्या भावना; ॲड. बाणावलीकर शोकसभा
कोल्हापूर, ता. ७ ः कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील पी. आर. बाणावलीकर (वय ८०) यांचे काल निधन झाले. त्यांची शोकसभा आज जिल्हा बार असोसिएशनमध्ये झाली. यानंतर बहुतांशी वकिलांनी कामकाज बंद ठेवले. आदर्श व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेल्याच्या भावना वकिलांनी व्यक्त केल्या.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने सकाळी अकरा वाजता न्यायसंकुल येथे शोकसभेचे आयोजन केले होते. सभेत आदरांजली वाहण्यात आली. यानंतर असोसिएशनचे सचिव अँड विजय ताटे-देशमुख यांनी ॲड. पी आर बाणावलीकर यांच्या वकिलीतील योगदानाबाबत माहिती दिली. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. व्ही. एन. घाटगे, यांच्यासह ॲड. संपतराव पवार,ॲड. रमेश कुलकर्णी, ॲड. पी. आर. पाटील,ॲड. बाळासाहेब पाटील, ॲड विवेक शुक्ल, ॲड. आसावरी कुलकर्णी, ॲड. बी. एस. नेर्ले यांनी भावना व्यक्त केल्या. वकिलीतील आदर्श व्यक्तिमत्व हरपल्याने कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, पक्षकारांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याच्या भावना व्यक्त झाल्या. ‘ज्युनियर’ वकिलांसाठी आदर्श ‘सीनियर’ कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ॲड. पी आर बाणावलीकर होते. खंडपीठ मागणी चळवळीत ॲड.बाणावलीकर यांनी केलेला पाठपुरावा उल्लेखनीय असल्याच्याही भावना व्यक्त झाल्या.