स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांच्या सदनिकाच अस्वच्छ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांच्या सदनिकाच अस्वच्छ
स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांच्या सदनिकाच अस्वच्छ

स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांच्या सदनिकाच अस्वच्छ

sakal_logo
By

लोगो ः टुडे १ वरून घेणे भाग ३
-------------------------------
81309
इचलकरंजी : सदनिकांच्या पिलरची दुर्दशा झालेली आहे.
------------
स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांच्या सदनिकाच अस्वच्छ
इमारतीच्या पिलरमधील सळ्या बाहेर; पावसात भिंतीमधून झिरपते पाणी
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ९ : शहर स्वछ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सदनिका आज अस्‍वच्‍छतेच्या विळख्यात सापडलेल्या दिसत आहेत. शहरात इतर सदनिकांच्या तुलनेत महापालिकेच्या सदनिकांची संख्या अधिक आहे. यामधील काही सदनिकांना ४० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. महापालिका देखभाल दुरुस्ती करीत असली तरी काही सदनिकांची स्थिती अत्यंत खराब आहे. सोबत सदनिकांच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य बनले आहे. त्यामुळे शहर स्वछ ठेवण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्याने येथे दाटीवाटीच्या वस्त्या अधिक आढळून येतात. त्यासोबत दररोज कामानिमित्त बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडून होणारा कचरा व त्यामधून पसरणारे आजार थोपवण्याचे काम महापालिकेचा आरोग्य विभाग करीत आहे. एकीकडे शहर स्वछ ठेवत असताना निवारा असलेल्या सदनिका मात्र स्वछ ठेवण्यास या कर्मचाऱ्यांना अपयश येताना दिसत आहे. त्यासोबत काही सदनिकांची दुरवस्था झाली असून इमारतीच्या पिलरमधील सळया बाहेर आल्या आहेत. भिंतीची देखभाल दुरुस्ती न झाल्याने पावसाचे पाणी पाझरत असते. परिणामी या कर्मचाऱ्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबाचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
इचलकरंजी शहरात महापालिकेच्या मालकीच्या ३५७ सदनिका आहेत. यामध्ये गोविंदराव हायस्कूलसमोर असलेल्या नर्सिंग कॉटर्समध्ये २४, खंजिरे मळा येथे चार इमारती असून येथे ७८ कुटुंब राहत आहेत. कामगार चाळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी २५५ सदनिका आहेत. यामधील अधिकतर सदनिकांचे बांधकाम व रचना जुनी असल्याने वाहने पार्किंग, जागेची कमतरता, भौतिक सुविधांचा अभाव अशा अनेक समस्या उद्‌भवत आहेत. काही जुन्या इमारतींची डागडुजी केली आहे. मात्र अद्याप अनेक सदनिकांना दुरुस्तीची आवश्यकता आहे.
--------
चार सदनिकांचे निर्लेखीकरण
गोविंदराव हायस्कूलसमोरील नर्सिंग कॉटर्स दुरवस्थेत असून येथील चार सदनिकांचे स्ट्रक्चर ऑडिट करून रिकाम्या केल्या आहेत. या चार सदनिकांची अवस्था अत्यंत खराब असल्याने त्या निर्लेखीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
-------
महापालिका मालकीच्या असलेल्या बहुतांशी सदनिकांची दुरुस्ती करण्यात आली आहे. ज्या सदनिकांना आवश्यक ती डागडुजी करून कर्मचाऱ्यांना सुरक्षित निवारा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करीत आहे.
-सचिन पाटील, मिळकत पर्यवेक्षक