हिरण्यकेशी तुडूंब

हिरण्यकेशी तुडूंब

Published on

फोटो क्रमांक : gad८४.jpg
८१३०६
जरळी : चित्रीतील पहिल्या आवर्तनामुळे हिरण्यकेशी नदी तुडूंब आहे. जरळी बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा झाला. (छायचित्र : संजय धनगर)
-----------------------------------------------------
‘चित्री’तून आवर्तनामुळे हिरण्यकेशी तुडुंब
गडहिंग्लज तालुका ; २७० एमसीएफटी पाण्याने रब्बी, उसाला दिलासा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : चित्री मध्यम प्रकल्पामधून पाटबंधारे विभागाने पाण्याचे पहिले आवर्तन हिरण्यकेशी नदीत सोडले. १७ दिवसांमध्ये २७० एमसीएफटी पाणी पात्रात साठल्याने हिरण्यकेशी तुडुंब झाली आहे. यामुळे रब्बी पिकांसह ऊस क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.
पावसाळ्याचे पाणी वेळेत अडवण्याच्या नियोजनात काहीसे दुर्लक्ष झाले. परिणामी जानेवारीतच पाण्याची पातळी खाली जाण्याच्या शक्यतेने आंबेओहोळमधून पाणी घेवून बंधारे भरुन घेण्यात आले. यामुळे ‘चित्री’तील आवर्तनाचा कालावधी पुढे गेला. अन्यथा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच पाणी सोडावे लागले असते. तरीसुद्धा यावर्षी दहा दिवस आधी चित्रीतील पाण्याचे पहिले आवर्तन सोडावे लागले. २० जानेवारीला चित्रीतून १८० क्युसेक्सने पाणी हिरण्यकेशी नदीत सोडले. ६ फेब्रुवारीला हे आवर्तन बंद केले. या सतरा दिवसांच्या कालावधीत २७० एमसीएफटी पाणी नदीवरील बंधाऱ्यामध्ये साठवले आहे. प्रत्येक बंधाऱ्यात अडीच ते ३ मीटरवर पाणीसाठा झाला आहे. यामुळे हिरण्यकेशी नदी तुडुंब भरली असून या पाण्याचा लाभ ऊस आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी होणार आहे. पहिल्या आवर्तनाचे पाणी कडलगेच्या खोत बंधाऱ्यापर्यंत पोचले आहे.
यापुढे पाण्याची गरज अधिक भासणार आहे. उन्हाच्या झळामुळे पिकांना अधिक पाणी लागणार असल्याने त्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. चित्रीतून पाच आवर्तन सोडण्यात येणार आहेत. उन्हाळ्याचे पाणी नियोजन करताना लाभक्षेत्रापर्यंत पाणी लवकर पोहचण्यासाठी गरज असेल तरच काही दिवसासाठी उपसाबंदी करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाचे आहे. २० ते २२ फेब्रुवारीला चित्रीचे दुसरे आवर्तन सोडणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तालुक्यातील लघु पाटबंधारे तलावातही समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. या तलावांच्या पाण्यातून परिसरातील ऊस, रब्बी पिकांचे उत्पादन घेतले जात आहे.

चौकट...
* प्रकल्पांतील पाणीसाठा
चित्री मध्यम प्रकल्पात १४८७ एमसीएफटी असून वैरागवाडी लघु पाटबंधारे तलावात ७३ टक्के, शेंद्री ७४, करंबळी ८५, तेरणी ७९, नरेवाडी ९२, येणेचवंडी ७४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.