एज्युकेशन बातम्या

एज्युकेशन बातम्या

81344
नासिरा खान राज्यात प्रथम
कोल्हापूर : नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांनी घेतलेल्या परीक्षांमध्ये पंचाचार्य होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाची चतुर्थ वर्षामधील विद्यार्थिनी नासिरा बानू फरिद अहमद खान महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. नासिराने १९८४ गुण मिळवले. १३ फेब्रुवारीला होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये तिला गौरविण्यात येणार आहे. नासिरा ही मुलींमध्ये राज्यात प्रथम आली असून, होमिओपॅथी विषयामध्येही प्रथम आली. तिने तीन सुवर्णपदके मिळवली. संस्थेमार्फत ठेवलेल्या डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी पारितोषिकांची ती मानकरी ठरली. होमिओपॅथिक ‘मटेरिआ मेडिका’ विषयात विद्यापीठ परीक्षेत सर्वांत जास्त गुण मिळाल्याबद्दल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन (होमेसा) यांच्यामार्फत असणारे पारितोषिक नासिरालाच मिळाले. जगद्‌गुरू पंचाचार्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एम. जी. वालिखिंडी यांचे प्रोत्साहन, तर प्राचार्य डॉ. राजकुमार पाटील, डॉ. रविकुमार जाधव, डॉ. एस. एन. मोरे, डॉ. सुहास पाटील, डॉ. सुजाता कामिरे, डॉ. सुनेत्रा शिराळे, डॉ. सुजाता भरमगुंडे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचा निकाल १०० टक्के लागला.
...
‘ई.पी.एस. ९५’ पेन्शनरांची उद्या सभा
कोल्हापूर : गेली १२ वर्षे पेन्शनवाढीसाठी प्रयत्न करूनही पेन्शन वाढ झालेली नाही. तसेच २०२३ च्या अर्थसंकल्पातही तरतूद केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये भविष्य निर्वाह निधी कोल्हापूरमार्फत मार्गदर्शन केले जात नाही किंवा लेखी दिले जात नाही. यासाठी ई.पी.एस. ९५ पेन्शनरांना जागृत करण्यासाठी शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी चार वाजता लक्ष्मीपुरी येथील श्रमिक कार्यालयात सभा बोलविली आहे. सभेस ऑल इंडिया ई.पी.एस. ९५ संघटनेचे सहनिमंत्रक अतुल दिघे मार्गदर्शन करणार आहेत. सभेस कोल्हापूर शहर आणि परिसरातील पेन्शनरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव, नारायण मिरजकर, गोपाळ पाटील, सुनील बारवाडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
...
प्रबुद्ध भारत हायस्कूलमध्ये कथाकथन स्पर्धा
कोल्हापूर : प्रबुद्ध भारत हायस्कूलतर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त जिल्हास्तरीय आंतरशालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेकरिता आपल्या शाळेतील इच्छुक विद्यार्थी, विद्यार्थिनींना पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे. यावेळी रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र दिले जाईल. प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र मिळेल. पारितोषिक वितरण सोमवारी (ता. २७) प्रबुद्ध भारत हायस्कूल, लक्षतीर्थ वसाहत येथे होईल. शनिवारी (ता. २५) सकाळी नऊ ते दुपारी एक वेळेत स्पर्धा असेल.
...
शाहू कॉलेजमध्ये शनिवारी कार्यशाळा
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये शनिवारी (ता. ११) ‘सेंद्रिय शेतीचे महत्त्व व विक्री व्यवस्था’ यावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. महाविद्यालयातील अर्थशास्त्र, कॉमर्स, कॉमर्स आय.टी. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षतर्फे कार्यशाळा होईल. नरके फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चेतन नरके यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. पहिल्या सत्रामध्ये एस. बी. बागल ‘सेंद्रिय शेतीचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन करतील. या सत्रासाठी अध्यक्ष म्हणून हेर्लेचे सरपंच राहुल शेटे असतील. तिसऱ्या सत्रामध्ये कृषी उद्योजिका रुपाली माळी प्रमुख वक्त्या आहेत. त्या सेंद्रिय शेतीचे महत्त्व व विक्री व्यवस्था यावर माहिती देतील. कार्यशाळेसाठी शेतकरी बांधव, शेतीसंबंधित उद्योजकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. एल. डी. कदम यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
...
मराठा वधू-वरांचा रविवारी महामेळावा
कोल्हापूर : राज्यातील सर्वांत मोठा मराठा वधू-वरांचा महामेळावा रविवारी (ता. १२) केशवराव भोसले नाट्यगृह येथे होणार आहे. त्र्यंबोली वधू-वर सूचक केंद्र, जिल्हा सामाजिक सेवा व सांस्कृतिक मंगल कार्यालय संघ, जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेशन असोसिएशन, ऑल टेंट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र, इव्हेन्ट मॅनेजमेंट अॅन्ड प्लॅनर असोसिएशन, कोल्हापूर वेल्फेअर केटरींग असोसिएशन, जिल्हा साउंड लाईट जनरेटर असोसिएशन, फ्लॉवर डेकोरेशन असोसिएशन, आम्ही रथवाले असोसिएशन, आम्ही बॅंडवाले असोसिएशन, सर्व जातीधर्म वधू-वर सूचक संस्थेतर्फे (पश्चिम महाराष्ट्र) आयोजन केले आहे. सकाळी दहा वाजता मेळाव्याचे उद्‌घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होईल. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, इतर राज्यातील पालक वधू-वरांसह उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचा सर्व मराठा वधू-वरांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष सागर चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केले आहे. माहितीसाठी उमेश देसाई यांच्याशी संपर्क साधावा.
...
81371
कोल्हापूर : शाहू महाराज हायस्कूलमध्ये बक्षीस वितरणप्रसंगी उपस्थित मान्यवर.

शाहू महाराज हायस्कूलमध्ये बक्षीस वितरण
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे वक्तृत्व, निबंध, चित्रकला, सुगम गायन स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, विद्या समितीचे अध्यक्ष श्रीराम साळुंखे, आजीव सेवक एस. वाय. काटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. श्री. गावडे यांनी कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न महत्त्वाचे असतात. अपयशाने खचून जायचे नसते, असा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला. श्री. साळुंखे यांनी शिक्षणमहर्षी बापूजींनी सुरू केलेल्या या स्पर्धांचा उद्देश स्पष्ट केला. अमित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. जे. आर. जोशी यांनी आभार मानले.
...
कमला कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर
कोल्हापूर : कमला कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर झाले. पडवळवाडीचे सरपंच पोपटराव अतिग्रे यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन झाले.
शालेय समितीचे अध्यक्ष शशिकांत पडवळ उपस्थित होते. ‘युवक आणि देशविकास’ यावर चर्चासत्र झाले. प्रा. एन. एस. शिरोळकर यांचे ‘समान नागरी कायदा’, प्रा. पी. एस. जाधव यांचे ‘जलसाक्षरता’, ॲक्युप्रेशर तज्ज्ञ अरविंद पालके यांचे ‘निसर्ग उपचारातून शरीराचे संवर्धन’ यावर प्रात्यक्षिक झाले. ‘शालेय जीवन आणि संविधान’ यावर यशवंत चौगुले यांचे व्याख्यान झाले. तसेच रक्त तपासणी, आरोग्य तपासणी शिबिर झाले. सेवा रुग्णालय बावडा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गणेश बंगे यांनी आरोग्य तपासणी केली. रक्त तपासणीसाठीच्या रक्त संकलनाचे काम टेक्निशियन अमर कुंभार, विकास पाटील यांनी पाहिले. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर झाले. एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल घस्ते, प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी संयोजन केले. प्रा. स्वाती कांबळे, प्रा. चिन्मई सांगळे, मुख्याध्यापक नानासाहेब गिरी, सहशिक्षकांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com