चंदगडला डोकीवरील आरतीचा विधी

चंदगडला डोकीवरील आरतीचा विधी

chd82.jpg
81353
चंदगड ः श्री देव रवळनाथ यात्रोत्सवानिमित्त डोकीवरील आरतीचा विधी झाला.
------------------------------------------
चंदगडला डोकीवरील आरतीचा विधी
रवळनाथ यात्रोत्सव, हजारो भाविकांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ८ ः चंदगडसह परीसरातील चौऱ्यांशी खेड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव रवळनाथाच्या वार्षिक यात्रोत्सवातील डोकीवरील आरतीचा मुख्य विधी आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. पालखीवर लाडू चिरमुऱ्यांची उधळण करीत आरती आणि पालखी मिरवणुकीत सहभाग नोंदवला.
सकाळी देवाला अभिषेक आणि महापूजा केली. त्यानंतर मानकऱ्यांच्या उपस्थितीत प्राथमिक विधी झाले. दुपारी अडीचच्या सुमारास डोकीवरील आरतीला प्रारंभ झाला. विलास गुरव यांच्या डोकीवर आरती ठेवल्यानंतर देवाच्या जयघोषाचा एकच गजर झाला. त्यानंतर आरती मानकऱ्यांसह मंदिराच्या बाहेर पडली. मंदिर परीसरातील सर्व देवीदेवतांची भेट घेऊन ही आरती पुन्हा मंदिरात स्थानापन्न झाली. दरम्यान पालखी आणि सासनकाठीच्या पाच प्रदक्षिणा झाल्या. यावेळी उपस्थित भाविकांनी लाडू चिरमुऱ्यांची केलेली उधळण डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. मंदिराचे आवार, विठ्ठल मंदिराच्या छतावर भाविकांनी उभे राहून हा सोहळा पाहिला. हा विधी झाल्यानंतर देवाच्या दर्शनासाठी गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी येत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com