शिवजयंतीसाठी बैठक

शिवजयंतीसाठी बैठक

Published on

फोटो क्रमांक : gad86.jpg
81424
गडहिंग्लज : मराठा मंडळातर्फे आयोजित बैठकीत किरण कदम यांनी शिवजयंतीची रुपरेषा सांगितली. यावेळी शहरातील प्रमुख उपस्थित होते.
-----------------------------------------------------------
सर्वधर्मसमभाव परंपरेची शिवजयंती करू

गडहिंग्लजला नियोजन बैठक; हत्ती, घोड्यांसह मिरवणुकीला शिवकालीन रूप

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. ८ : महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला राजकीय चेहरा न देता 40 वर्षापासून सर्वधर्मसमभावाची शिवजयंती साजरी करण्याची परंपरा आहे. तीच परंपरा यावर्षीही कायम ठेवण्याचा निर्णय मराठा मंडळातर्फे आज झालेल्या नियोजन बैठकीत घेण्यात आला. हत्ती-घोड्यांच्या समावेशासह मिरवणुकीला शिवकालीन स्वरूप देण्याचेही ठरले.
मराठा मंडळाच्या कार्यालयात ही बैठक झाली. वीरशैव समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष राजशेखर दड्डी अध्यक्षस्थानी होते. मंडळाचे अध्यक्ष किरण कदम यांनी शिवजयंतीच्या नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘काही लोक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवजयंती साजरी करताहेत. परिणामी राजाच्या जयंतीला राजकीय वास येत आहे. शिवराय सर्वांचे आहेत. यामुळे त्या शिवजयंतीलाही आमच्या शुभेच्छाच असतील. सर्व महापुरुषांची जयंती सर्वधर्मीयांनी एकत्र येवून साजरी करण्याची परंपरा गडहिंग्लजची आहे. तीच परंपरा मराठा मंडळाने विश्‍वासाने पुढे चालविली आहे.’
मंडळाचे उपाध्यक्ष शिवाजी भुकेले यांनी दरवर्षीप्रमाणेच सर्वधर्मीय, तरुण मंडळे, महिलांनी यंदाच्या जयंतीलाही बळ देण्याचे आवाहन केले. प्रा. आशपाक मकानदार यांनी शिवरायांची जयंती ही एकाच राजकीय विचाराला बांधून चालणार नाही, तर शिवजयंतीत सामाजिक विचार असायला हवा, असे सांगितले. अरविंद बारदेस्कर यांनी सर्व समाजाला सोबत घेवून हा उत्सव साजरा करण्याची अपेक्षा वर्तविली. रियाज शमनजी यांनी शिवजयंती उत्सवाची संयोजक देतील ती जबाबदारी विश्‍वासाने पूर्ण करण्याची ग्वाही दिली. राजशेखर दड्डी यांनी वीरशैव समाजाचेही शिवजयंतीला पाठबळ राहील अशी ग्वाही दिली. सिद्धार्थ बन्ने, सुनिल शिंत्रे, रामगोंडा उर्फ गुंडू पाटील, राजन पेडणेकर, सिद्धार्थ बन्ने, सुनिता नाईक़, सचिन देसाई, के.बी. पोवार, महेश सलवादे, सुवर्णलता गोईलकर यांनीही आपल्यावरील जबाबदारी पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. दिलीप माने, अर्जून रेडेकर, सुनील चौगुले, रामदास कुराडे, सुरेश कोळकी, वसंत यमगेकर, रमजान अत्तार, डॉ. अजित पाटोळे, आप्पा शिवणे, दिपक कुराडे, युवराज बरगे, अमर मांगले, सूरज माने, मंजूषा कदम, कावेरी चौगुले, स्नेहलता भुकेले, रफिक पटेल, उदय परीट आदी उपस्थित होते.

चौकट...
* काय असेल नियोजन
- महिला दांडपट्टा, लेझीम व झांजपथकाचा समावेश
- बचत गट महिलांसह तरुणांचा सहभाग वाढविणार
- आतषबाजी, रोषणाईचेही नियोजन
- ग्रामीण भागातील चित्ररथांचाही समावेश
- सायंकाळी पाचला छ. शिवाजी चौकातून मिरवणुकीला प्रारंभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.