
डॉ. चन्ना सिद्धराम महास्वामींची अलायन्स हॉस्पीटलला भेट
ich86.jpg
81445
इचलकरंजी ः अलायन्स हॉस्पिटलला श्री १००८ जगद्गुरू डॉ. चन्ना सिद्धराम पंडितआराध्य महास्वामी यांनी भेट दिली.
डॉ. चन्ना सिद्धराम महास्वामींची
अलायन्स हॉस्पिटलला भेट
इचलकरंजी : येथील अलायन्स हॉस्पिटलला श्री १००८ जगद्गुरू डॉ. चन्ना सिद्धराम पंडितआराध्य महास्वामी (श्रीशैल पीठ, आंध्रप्रदेश) यांनी भेट दिली. त्यांनी रुग्णालयातील सर्व विभाग व सुविधांची माहिती घेतली. रुग्णालयात सुरू झालेल्या आरोग्य कर्नाटक योजनेचा प्रारंभ त्यांच्याहस्ते केला. योजनेमुळे सीमाभागातील रुग्णांना मोठा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामींनी आवाहन केले. मुधोळ साखर कारखाना अध्यक्ष जगदीश गुंडगठी, कर्नाटक खनिज कॉर्पोरेशनचे संचालक डॉ. एम. आर. पाटील, आरोग्य कर्नाटकचे चिक्कोडी तालुकाप्रमुख डॉ. शरणप्पा गंडेड उपस्थित होते. डॉ. बाळकृष्ण कित्तुरे यांनी स्वागत केले.