
वितरण विभाग बातम्या
81448
कोल्हापूर : यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक.
देशमुख सेकंडरी इंग्लिश स्कूलचे यश
कोल्हापूर : शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये श्री. व. ज. देशमुख सेकंडरी इंग्लिश स्कूलचा इलिमेंटरी ड्रॉईंग आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला. इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये दहा विद्यार्थ्यांनी ए ग्रेड, सात विद्यार्थ्यांनी बी ग्रेडमध्ये तसेच सहा विद्यार्थ्यांनी सी ग्रेडमध्ये यश मिळविले. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत मेन राजाराम हायस्कूल केंद्रामधून गुणवत्ता यादीत सुरभी सणगर हिने ६३ वा, तसेच वेदिका पटेल हिने ९८ वा क्रमांक मिळवला. तसेच इलिमेंटरीमध्ये ए ग्रेडमध्ये चार विद्यार्थ्यांनी, तर बी ग्रेडमध्ये दहा विद्यार्थ्यांनी यश मिळविले. संस्थाध्यक्ष वसंतराव देशमुख, सचिव सुनील कुरणे, संचालक शारंगधर देशमुख, मुख्याध्यापक सुरेश कांबळे, मुख्याध्यापिका रूपा पास्ते, कला शिक्षक प्रियदर्शनी अनावकर, तसेच इंद्रजित कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.