
प्रेस क्लब
81474, 81475, 81476
कोल्हापूर प्रेस क्लबच्या
अध्यक्षपदी शीतल धनवडे
प्रशांत आयरेकर उपाध्यक्ष; दिलीप भिसे कार्याध्यक्ष
कोल्हापूर, ता. ९ : पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी शीतल धनवडे (दै. सामना) यांची, तर उपाध्यक्षपदी प्रशांत आयरेकर (बी न्यूज) यांची निवड झाली. या निवडणुकीत कार्याध्यक्षपदी दिलीप भिसे (दै. पुढारी) आणि सचिवपदी बाबासाहेब खाडे (राजस्थान पत्रिका) यांची निवड झाली.
कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिवपदासह कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे प्रसिद्धी प्रमुख अलोक जत्राटकर, तसेच वृत्तपत्र विभागाचे प्रा. डॉ. शिवाजी जाधव यांनी निवड प्रक्रियेसाठी प्रमुख भूमिका बजावली. प्रेस क्लबच्या अन्य संचालकांची नावे अशी; शिवाजी यादव, नंदिनी नरेवाडी (दै. सकाळ), अश्विनी टेंबे (केसरी), समीर मुजावर (नवभारत), पांडुरंग दळवी (महासत्ता), जितेंद्र शिंदे (एस न्यूज), भारत चव्हाण, भीमगोंडा देसाई (दै. लोकमत), यशवंत लांडगे, संग्राम काटकर (दै. तरुण भारत), अभिजित पाटील (टाइम्स ऑफ इंडिया), भूषण पाटील (टीव्ही नाईन मराठी), पी. ए. पाटील (दै. पुढारी), सचिन सावंत (साम टीव्ही), आदित्य वेल्हाळ (दै. लोकमत), सुखदेव गिरी, बाबूराव रानगे (दै. पुण्यनगरी).