स्वखर्चानेच सदनिकांची दुरुस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वखर्चानेच सदनिकांची दुरुस्ती
स्वखर्चानेच सदनिकांची दुरुस्ती

स्वखर्चानेच सदनिकांची दुरुस्ती

sakal_logo
By

लोगो ः टुडे १ वरून घेणे भाग ः ४
81481
इचलकरंजी : सदनिकांच्या परिसरामध्ये झुडपे वाढली आहेत.

स्वखर्चानेच सदनिकांची दुरुस्ती
मध्यवस्तीत असूनही महसूल विभागाच्या इमारतींची दुरवस्था

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० : शहरामधून शासनास सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्यासाठी सदनिका आहेत याची कल्पना नसल्याचे चित्र इचलकरंजीमध्ये आहे. शासनाने शहरातील मध्यवस्तीत सुमारे पंधरा कुटुंब राहतील इतक्या सदनिका महसूल विभागासाठी उभ्या केल्या आहेत. मात्र त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. येथे केवळ चारच कुटुंब राहत आहेत. त्यांना ही अन्य पर्याय नसल्याने या सदनिकांची स्वखर्चाने दुरुस्ती करून दिवस काढत आहेत.
इचलकरंजी शहरात प्रांताधिकारी, अपर तहसील, मंडल अधिकारी, तलाठी, दोन निबंधक कार्यालये असून यामध्ये सुमारे ४० कर्मचारी कार्य करीत आहेत. महसूल विभागामधील कर्मचाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असल्याने त्यांच्या राहण्याची समस्या सोडवण्यासाठी शासनाने महेश सेवा केंद्र परिसरामध्ये सदनिका उभ्या केल्या आहेत. इमारतींना तीस वर्षांहून अधिक कालावधी झाला असून वेळीच डागडुजी न केल्याने अधिकतर इमारती मोडकळीस आल्या आहेत. संबंधित विभागाचे या सदनिकांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने त्या आज दयनीय अवस्थेमध्ये उभ्या आहेत. सदनिकामध्ये ड्रेनेज जाम, घरांची पडझड, इमारतीच्या भिंतीमधून आलेली वृक्षे तसेच मोकळ्या जागेमध्ये वाढलेली झुडपे यामुळे येथे वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसराची साफसफाई होत नसल्याने शहराच्या मध्य वस्तीत जंगलाचा आभास होत आहे.
महसूल विभागासाठी असलेल्या या सदनिकांची अवस्था पाहून अनेक कर्मचारी खासगी जागेचा तर काही परगावाहून ये-जा करण्याचा पर्याय निवडला आहे. सध्या या सदनिका केवळ दिखाव्या पुरत्याच उभा असल्याचे चित्र आहे. सदनिकांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कठडे नसल्याने लहानसहान चोरीच्या घटनाही घडत असतात. मात्र तक्रार देण्यास टाळाटाळ केली जाते. सदनिकांची दुरुस्ती करून कर्मचाऱ्यांना राहण्यायोग्य केल्यास पूर परिस्थितीमध्ये रस्ते पाण्याखाली गेल्याने ओस पडणारे महसूल कार्यालयाचे कामकाज सुरू राहण्यास मदत होणार आहे.
(समाप्त)
--------
कुटुंबाच्या आरोग्याच्या तक्रारी
सदनिकांच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढल्याने येथे परिसरातील नागरिक कचरा टाकताना दिसतात. परिणामी येथे डास, उंदीर, भटकी जनावरे यांचा उपद्रव वाढत आहे. परिणामी वास्तव्यास असलेल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाने स्वछता, दुरुस्ती व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे.