
श्रमसंस्कार शिबिरातून आदर्श विद्यार्थी घडतो
श्रमसंस्कार शिबिरातून आदर्श विद्यार्थी घडतो
प्रसाद कुलकर्णी; खोतवाडी येथे जयवंत महाविद्यालयाचे शिबिर
तारदाळ, ता. ९ : श्रम संस्कार शिबिरातून अनेक विद्यार्थी घडत आहेत. स्वावलंबी व आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम श्रम संस्कार शिबिर करते, असे वक्तव्य प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
शहापूर येथील जयवंत महाविद्यालयाचे विशेष श्रम संस्कार शिबिरप्रसंगी सांगता समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सामाजिक बांधिलकी, श्रम प्रतिष्ठा, व्यक्तिमत्त्व विकास, मैत्रीभाव वृद्धिंगत यासाठी अशी शिबिर विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वाची असतात. स्वागत व प्रास्तविक प्रा. शांताराम कांबळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सत्यम देशिंगे याने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. संपतराव जाधव, प्रा. सुनील बुढ्ढे, ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे, वैभव पोवार, बजरंग चोपडे ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन कस्तुरी सावंत हिने केले. आभार अनस्वी खर्जे हिने मानले.