
शरद पॉलिटेक्निकमध्ये ‘रोबोटिक्स’वर कार्यशाळा
81590
यड्राव ः येथील शरद इन्स्टिट्युटमध्ये रोबोटिक्स विषयावर कार्यशाळा झाली.
शरद पॉलिटेक्निकमध्ये ‘रोबोटिक्स’वर कार्यशाळा
दानोळी, ता. ९ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये प्राध्यापकांसाठी एक आठवडा रोबोटिक्स या विषयावर कार्यशाळा झाली.
फानुक इंडिया प्रा. लि., कोल्हापूर येथील इनो विस्टा ऑटोमेशन व शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा झाली. यामध्ये विविध तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. कार्यशाळेमध्ये रोबोट हाताळणी प्रोग्रॅमिंग, रोबोट व पी. एल. सी. यांचे इंटिग्रेशन व रोबोटवर करण्यात येणारे वेगवेगळे अॅप्लिकेशन्स प्रॅक्टिकल स्वरुपात शिकवले. रोबोट हाताळताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय शिकवले. रोबोटिक्स कार्यशाळेचा उपयोग विद्यार्थ्यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी होईल, असे प्रतिपादन मार्गदर्शक फानुक इंडियाचे विशाल हत्ती यांनी केले.
कार्यशाळेसाठी संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांचे प्रोत्साहन लाभले. प्राचार्य बी. एस. ताशीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मेकॅट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख प्रा. एस. एन. बोडके, ऑटोमेशन व रोबोटिक्स विभागाच्या प्रमुख प्रा. पी. एस. माळी, प्रा. बी. बी पाटील व प्रा. आर. आर. कापसे यांनी केले.