Thur, March 23, 2023

आजरा ः संक्षिप्त बातमी
आजरा ः संक्षिप्त बातमी
Published on : 9 February 2023, 6:45 am
चित्रकला स्पर्धेत व्यंकटरावचे यश
आजरा, ता. 9 ः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा पर्व सहा अंतर्गत संपूर्ण देशभर चित्रकला स्पर्धा झाली. पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा यांच्यावतीने तालुकापातळीवर घेण्यात आली. व्यंकटराव हायस्कूलचा स्वराज नाथ देसाई याने द्वितीय क्रमांक मिळविला. उमेश सोपान केरकर व स्वरूप संतोष गोविलकर यांनाही उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. आजरा महाल शिक्षण मंडळाचे सचिव एस पी कांबळे, प्रशालेचे प्राचार्य आर. जी. कुंभार, पर्यवेक्षक सौ.व्ही. जे. शेलार यांचे हस्ते विजेत्यांचा सत्कार झाला. त्याचबरोबर मार्गदर्शक कलाशिक्षक कृष्णा दावणे यांचाही सत्कार केला. यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी व सर्व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन लाभले.