नाईक पतसंस्थेमार्फत प्रशिक्षण शिबीर

नाईक पतसंस्थेमार्फत प्रशिक्षण शिबीर

Published on

ajr93.jpg
81643
आजरा ः पी.डी. यादव यांचा सत्कार पांडुरंग शिपुरकर यांनी केला. या वेळी प्रा. डॉ. शिवशंकर उपासे आदी उपस्थित होते.
--------------------------------------
नाईक पतसंस्थेमार्फत प्रशिक्षण शिबिर
आजरा, ता. ९ ः येथील शिक्षणतपस्वी जे. पी. नाईक पतसंस्था आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघातर्फे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर झाले. तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक एस.टी. जाधव, पी. डी. यादव प्रमुख उपस्थित होते.
जे. पी. नाईक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. शिवशंकर उपासे, पांडुरंग शिपूरकर, कृष्णा येसणे व श्रावण जाधव यांच्या हस्ते शाल, पुस्तके व स्मृतिचिन्ह देऊन अनुक्रमे एस. टी. जाधव, पी. डी. यादव, प्राचार्य ढेरे व एस. एस. देसाई यांचा सत्कार झाला. प्रा. जाधव यांनी सहकारी कायद्यातील बदल हा विषय मांडला. श्री. यादव यांनी कर्ज देतांना घ्यावयाची काळजी आणि थकबाकी वसूल करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांनी प्रश्न विचारले. सहकार अधिकारी श्री. देसाई, सचिव संतोष जाधव, कॅशिअर संजय तेजम, निकिता स्वामी, सतीश सुतार, सुभाष पाटील, तुषार येरुडकर यांनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.