भाजप पाणीपुरवठा

भाजप पाणीपुरवठा

Published on

प्रश्‍नांबाबत उत्तरे न दिल्यास
घेराओ; भाजपचा इशारा
कोल्हापूर, ता. ९ : शहराच्या पाणीपुरवठ्याची श्‍वेतपत्रिका तसेच इतर प्रश्‍नांबाबत प्रशासनाने त्वरीत उत्तरे न दिल्यास भाजप महापालिकेला घेराओ घालून साखळी आंदोलन करेल, असा इशारा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकाद्वारे दिला.
पत्रकात म्हटले आहे, महापालिका पाणीपुरवठ्याबाबत असंवेदनशील असून भाजप या प्रश्‍नी निकराचा लढा देणार आहे. त्यासाठी प्रशासन जबाबदार राहील. शिंगणापूर पंप दुरुस्तीची फाईल दिलेली नाही. अन्य त्रुटींबाबत व विषयांची माहिती देण्यासही टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे २०१५ नंतरच्या पाणीपुरवठ्याची श्वेतपत्रिका काढावी. प्रश्‍न सोडवण्याची प्राधान्याने भूमिका घ्यावी. ६५ टक्के गळती असूनही प्रशासक दखल घेत नाहीत. त्यामुळे नेमके पाणी कुठे मुरतय याचा भाजप सोक्षमोक्ष लावणार आहे. शासनाकडे या विषयाची तड लावली जाईलच. संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणीही केली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी व प्रशासकांनी माहिती त्वरित उपलब्ध करून देत श्वेतपत्रिका काढावी, पाणी परिषद ह्यावी, पाणी ऑडीटची प्रत मिळावी या मागण्यांबाबत प्रशासन गंभीर नाही. कोणाच्या तरी दबावाखाली काम करते आहे का? असा प्रश्न आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.