सायबर कॉलेजतर्फे बक्षीस वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबर कॉलेजतर्फे बक्षीस वितरण
सायबर कॉलेजतर्फे बक्षीस वितरण

सायबर कॉलेजतर्फे बक्षीस वितरण

sakal_logo
By

81673
कोल्हापूर : ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी डावीकडून शरद आजगेकर, प्रा. डॉ. दीपक भोसले, संदीप चोडणकर, प्रा. डॉ. मकरंद ऐतवडे, विनायक देसाई.

पर्यावरण रक्षणासाठी युवकांनी
पुढे यावे : संदीप चोडणकर
कोल्हापूर, ता. १३ : ‘वाढणारे प्रदूषण हानिकारक बनत असून, प्रदूषण रोखण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा’’, असे मत पर्यावरण अभ्यासक संदीप चोडणकर यांनी व्यक्त केले.
किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचा सामाजिक बांधिलकी उपक्रम, लक्ष्मी फाउंडेशन गर्जन तालुका करवीरतर्फे समाजकार्य विभाग सायबर कॉलेज यांच्या सहकार्याने ‘ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. समाजकार्य विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक भोसले अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. मकरंद ऐतवडे, किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर, लक्ष्मी फौंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई उपस्थित होते. शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज (प्रथम), कला प्रबोधिनी कोल्हापूर (द्वितीय), समाजकार्य विभाग सायबर (तृतीय) क्रमांक मिळाला.
विनायक देसाई यांनी सूत्रसंचलन केले. जिल्ह्यातील ११ महाविद्यालयांनी स्पर्धेत सहभाग घेतला.