आयजीएमच्या अडचणी दूर करणार

आयजीएमच्या अडचणी दूर करणार

ich94.jpg
81676
इचलकरंजी ः आयजीएम रुग्णालयातील महाआरोग्य शिबिरप्रसंगी उपस्थित माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने उपस्थित होते.

आयजीएमच्या अडचणी दूर करणार
ःनिवेदिता माने; इचलकरंजीत महाआरोग्य शिबिराला प्रतिसाद

इचलकरंजी, ता. ९ ः खासदार धैर्यशील माने व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या माध्यमातून शासनाच्या आयजीएम रुग्णालयातील अडीअडचणी दूर करण्यात येतील. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आधार देणारे हे रुग्णालय पुढील काळात सक्षम होईल, असा विश्वास माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना व सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने आयजीएम रुग्णालयात महाआरोग्य व रक्तदान शिबिर आयोजित केले होते. उपक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. मुखमंत्री शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी या राज्यस्तरीय उपक्रमाचे ऑनलाईन उद्‍घाटन केले.
महाआरोग्य शिबिरात मोफत हृदयरोग चिकित्सा, निदान व शस्त्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय गरोदर मातांची तपासणी, बाल आरोग्य तपासणी, तसेच सुदृढ बालक पालक अभियान राबवले. बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, राहुल आवाडे, रवी रजपुते, रवींद्र लोहार, मोहन मालवणकर, राजू आरगे, योगेश साळे, प्रेमचंद कांबळे, डॉ. अशोक हुबेकर, डॉ. दिलीप वाडकर, डॉ. महेश महाडिक, डॉ. एस. ए. नायकवडे, डॉ. संदीप मिरजकर, डॉ. मानसी कदम उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com