गुळ सौदे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुळ सौदे सुरू
गुळ सौदे सुरू

गुळ सौदे सुरू

sakal_logo
By

लोगो-बाजार समिती
-

गूळ सौद्याचे माथाडी कामावर परतले
कोल्हापूर, ता. ९ ः शाहू मार्केट यार्डातील माथाडींची मजुरी जास्त दिली जात असेल तर तूर्त कोणती वाढ न मागता पूर्वीच्या मजुरी दराप्रमाणे काम सुरू करावे, अशी सूचना कामगार अप्पर आयुक्त एस. जी. पोळ यांनी दिली. त्यानंतर आज माथाडी कामगारांनी मार्केट यार्डात गूळ सौद्यात काम सुरू केले. त्यामुळे मजुरी वाढीतून निर्माण झालेला पेच दूर झाला असून, गूळ सौदे सुरू झाले आहेत.
माथाडींना मजुरी वाढीच्या मागण्यासाठी मार्केट यार्डातील माथाडी कामगारांनी काम बंद केल्याने तीन दिवस गूळ सौद्यांचा पेच निर्माण झाला. माथाडींना निलंबित करावे. तसेच, बाहेरच्या गावातून माथाडी कामगार आणून सौदे सुरू करावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. त्यानंतर शाहू मार्केट यार्डात काल बाहेरगावचे माथाडी कामगार आणून पोलिस बंदोबस्तात गूळ सौदे सुरू झाले.
पोळ यांच्या उपस्थित शेतकरी, व्यापारी व माथाडी यांची कामगार कार्यालयात बैठक झाली. त्यात राज्यातील अन्य बाजारपेठेपेक्षा कोल्हापुरातील गूळ बाजारात माथाडींना सर्वाधिक मजुरी दिली जाते. त्यामुळे आता मजुरी वाढ देणे शक्य नसल्याचे सांगितले. तर माथाडी कामगारांनी मजुरी वाढ देण्याचा आग्रह धरला. पोळ यांनी माथाडी कामगारांची समजूत काढल्यानंतर त्यांनी काम सुरू केले.
करवीर तहसीलदारांनी माथाडी कामगारांना नोटीस बजावली आहे. माथाडीचे नेते व पदाधिकाऱ्यांनी मार्केट यार्डात जमाव जमवून शांतता भंग करू नये. बाजार समितीत शेतकरी, व्यापारी यांच्या जीवितास धोका होईल असे कोणतेही कृत्य करू नये. त्यासाठी १४४ कलम लागू केल्याची नोटीस बजावली. त्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवली आहे. त्यामुळे बाजारपेठेत अनधिकृत जमाव जमवता येणार नाही.