काँग्रेस प्रवक्ते पत्रपरिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस प्रवक्ते पत्रपरिषद
काँग्रेस प्रवक्ते पत्रपरिषद

काँग्रेस प्रवक्ते पत्रपरिषद

sakal_logo
By

gad98.jpg : सचिन सावंत 81678


कार्यकर्ता म्हणून थोरातांच्या
राजीनाम्यावर दु:खी ः सावंत


गडहिंग्लज, ता. ९ : सध्या काँग्रेसची एकजूट महत्वाची आहे. अशात थोरातांचा राजीनामा दु:खदायक असून, या घटनेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटी लक्ष घालेल, असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता सावंत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ईडीमुळे विरोधक एकत्र आल्याची कबूलीच मोदींनी दिली आहे. ईडीचा वापर करुन नेत्यांवरील कारवाईच्या माध्यमातून विरोधी पक्ष भाजप अस्थिर करीत आहे. हा प्रकार गंभीर असून यातून लोकशाहीचा ऱ्हास होत आहे. हिंदू धर्म किती उच्च आहे हे सांगण्यापेक्षा इतर धर्मांना वाईट मानण्याची पद्धत भाजप देशात आणत आहे.’ जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे, प्रशांत देसाई, एम. के. कांबळे, संतोष चौगुले, उत्तम देसाई, शिवाजी सावंत, नागराज जाधव उपस्थित होते.

कदाचित जिल्ह्याला मोठे पद?
सावंत म्हणाले, ‘माणिकराव ठाकरे कित्येक वर्षे गृहराज्यमंत्री होते. नंतर ते प्रदेशाध्यक्ष झाले. सतेज पाटील यांची गुणवत्ताही पक्षश्रेष्ठींसमोर आहे. भविष्यात त्यांच्यावरही मोठी जबाबदारी आल्याचे आपला जिल्हा डोळ्याने बघेल. दरम्यान, भाजपच्या चंद्रकांत पाटल यांची विधाने पाहिली तर ते मुरलेले राजकारणी वाटत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.