अतिरिक्‍त निधीसाठी जिल्‍हा परिषदेची तयारी

अतिरिक्‍त निधीसाठी जिल्‍हा परिषदेची तयारी

Published on

अतिरिक्‍त निधीसाठी
जिल्‍हा परिषदेची तयारी

आरोग्य, शिक्षण, बांधकामचे प्रस्‍ताव

कोल्‍हापूर, ता. ९ : जिल्‍हा नियोजन मंडळाचा निधी आता कमी वेळेत खर्च होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हा निधी जिल्‍हा परिषदेला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. यातूनच जिल्‍हा परिषदेच्या विभागांनी विविध योजना राबवण्याची तयारी केली आहे. जिल्‍हा परिषदेला निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत आहे. त्यामुळेच अतिरिक्‍त निधी मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
जिल्‍हा नियोजन मंडळाकडून सर्वच खात्यांना विकासकामांसाठी निधी दिला जातो; मात्र यातील स्‍थानिक स्‍वराज्य संस्‍थांनाच केवळ दोन वर्षांत निधी खर्च करण्याची परवानगी आहे. इतर विभागांना मिळालेला निधी एकाच वर्षात खर्च करावा लागतो. २०२२-२३ मधील निधीचे वाटप अजून झालेले नाही. या निधीच्या खर्चाची मुदत ३१ मार्च २०२३ ला संपणार आहे. आता केवळ ४१ दिवस बाकी असून, या काळात योजना घेणे, त्यांना मंजुरी घेणे, निविदा प्रक्रिया राबवणे आणि काम पूर्ण करून बिल काढणे इतर यंत्रणांना जवळपास अशक्य आहे. बांधकामांची कोणतीही कामे आता होणे शक्य नाही. त्यामुळे हा निधी जिल्‍हा परिषदेसह महापालिका, नगरपालिका व पंचायत समितींना द्यावा लागणार आहे.
जिल्‍हा परिषदेचे विविध विभाग, मनुष्यबळ, तांत्रिक कर्मचारी ही संख्या पाहता उपलब्‍ध होणारा निधी येथे खर्च होणे शक्य आहे. त्यामुळेच प्रलंबित योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे. शाळेच्या वर्गखोल्यांपासून पर्यटनापर्यंत व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामापासून ते पशुवैद्यकीय प्रयोगशाळेपर्यंत अनेक उपक्रम घेणे शक्य आहे. त्या दृष्‍टीने ग्रामपंचायत, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन विभागांनी योजनांचे प्रस्‍तावही तयार केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.