पाल ८ं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाल ८ं
पाल ८ं

पाल ८ं

sakal_logo
By

81691
गगनबावड्यात अंगणवाडीसेविकांचे
चक्काजाम आंदोलन
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व व मदतनीस यांनी गगनबावडा एसटी स्टँड जवळ चक्काजाम आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा अशा विविध मागण्यांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर त्यानी मोर्चाने पंचायत समिती गगनबावडा येथे जाऊन महिला बालकल्याण सीडीपीओ सुमन जाधव यांना निवेदन देण्यात दिले. सुपरवायझर पूजा खाडे यांनाही निवेदन दिले. या मागण्यासाठी गगनबावडा तालुक्यातील अंगणवाडीसेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी गगनबावडा अंगणवाडीसेविका प्रमुख प्रियांका पाटील, वर्षा पांगळे, नंदा कांबळे, भारती कोळेकर, बाळाबाई शिंदे, उमा सप्रे, रेशमा कांबळे अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.