
उजळाईवाडी दारू अड्डे उद्धवस्त
81682
१६ गावठी दारू अड्डे
उजळाईवाडीत उद्धवस्थ
स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई; १ लाखावर मुद्देमाल जप्त
कोल्हापूर, ता. ९ ः उजळाईवाडी (ता. करवीर) येथील गावठी हातभट्टीच्या दारु अड्ड्यावर आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून छापा टाकला. तेथील १६ गावठी दारू अड्ड् उद्धवस्थ करून सुमारे १ लाख १७ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. येथे तीघांना ताब्यात घेतले असून, तिघे पळून गेले आहेत. एकूण सहा जणांच्या विरोधात गोकूळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, की करण शागिर्द तमायचे (वय २७) रोहन शागिर्द तमायचे (२५), अजित मनोज बागडे (३६ सर्व रा. कंजारभाट वसाहत, उजळाईवाडी ता. करवीर) यांना ताब्यात घेतले. तसेच महेश सुरेश गुमाणे, विष्णु सुरेश गुमाणे, आकाश किशोर गागडे (सर्व रा. कंजारभाट वसाहत, उजळाईवाडी ता. करवीर) हे पळून गेले आहेत. त्यामुळे सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गावठी दारू वापरण्यासाठी आणलेले कच्चे रसायन व तयार दारू नाश करण्यात आले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह पोलिस मुख्यालयाकडील १७ अंमलदार, अनैतीक व्यापार व मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडील महिला अधिकारी यांच्यासह पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. हातभट्टीच्या ठिकाणी दारु तयार करण्यासाठी वापरणार असलेले ३ हजार ८०० लिटर कच्चे रसायन व २३० लिटर तयार दारु असा मुद्देमाल जप्त केला. पाच ठिकाणच्या गावठी हातभट्टीची दारूविरूध्द कारवाई केली आहे. अवैद्य धंद्यावरील कारवाईचे मोहीम तीव्र करण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.