
शाहूनगर दगडफेक
८१६४४
-
जागेच्या वादातून शाहूनगर मारामारी
दोन्ही कुटुंबांच्या परस्पर विरोधी फिर्यादी; ३ जणांवर गुन्हा
कोल्हापूर, ता. ९ ः जागेच्या वादातून आज दुपारी शाहूनगर येथील चौकात दोन कुटुंबात जोरदार मारामारी होऊन दगडफेक करण्यात आली. या घटनेत चौघे जखमी झाले. मारामारी केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दोन्ही कुटुंबानी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार दोन्ही बाजूच्या १३ जणांवर गुन्हा दाखल केल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले.
घर बांधताना समाईक जागा सोडावी, तसेच गिलावा करतानाच्या किरकोळ कारणावरून आज दुपारी शाहूनगर चौकातील दोन कुटुंबात मारामारी झाली. एकमेकांच्या अंगावर दगडफेक, विटांची फेक केली. यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, यात शिवाजी सीताराम सांगावकर, सुधा अनिल सांगावकर, अक्षरा अनिल सांगावकर, संगीता अजित सांगावकर (सर्व रा. शाहूनगर, कोल्हापूर) हे जखमी झाले. याबाबत संगीता अजित सांगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी संदीप सुभाष सांगावकर, सुभाष सांगावकर, शोभा सुभाष सांगावकर (सर्व रा. शाहूनगर) या तिघांवर गुन्हा दाखल केला. तसेच संदीप सुभाष सांगावकर यांच्या फिर्यादीनुसार शिवाजी सीताराम सांगावकर, मोहन सीताराम सांगावकर (वय ५२), नामदेव सीताराम सांगावकर (वय ४५), आकाश अजित सांगावकर (वय २३), सागर प्रकाश सांगावकर (वय २६), सुनील नामदेव सांगावकर (वय २७), अनिल नामदेव सांगावकर (वय ३८), महेश विष्णू सांगावकर (वय २२), सोनाबाई नामदेव सांगावकर (वय ४०), हौसाबाई मोहन सांगावकर (वय ४२, सर्व रा. शाहूनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.