गडहिंग्लज आत्मह्त्या

गडहिंग्लज आत्मह्त्या

गडहिंग्लजला
आजाराला कंटाळून
वृद्धाची आत्महत्या

गडहिंग्लज, ता. ९ : शहरातील गुजर वसाहत येथे एका वृद्धाने अपल्या व मुलाच्या आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. विलास व्यंकू पाथरवट असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आज सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी सांगितले की, विलास यांना बीपी व शुगर चा त्रास होता. मुलगा युवराजलाही आजाराने ग्रासले आहे. दोघांच्याही आजाराला विलास कंटाळले होते. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली वावरत होते. आज घरातील मंडळी युवराजला उपचारासाठी कोल्हापूरला घेऊन गेले होते. त्यावेळी दुपारी घरात कोणी नसल्याने विलास यांनी तुळीला दोरीने गळफास घेतला. दरम्यान, कोल्हापूरहून घरातील मंडळी आल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. याबाबतची फिर्याद दीपक पाथरवट यांनी पोलिसात दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com