
आजरा ः मोर्चा बातमी
‘उर्दू’मधील गैरव्यवहार;
आजऱ्यात २० ला मोर्चा
आजरा, ता. १० : शैक्षणिक कामातील गैरव्यवहार व बनावट रेकॉर्ड व कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, या मागण्यासाठी येथील तहसील कार्यालयावर सोमवारी (ता. २०) मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन मुक्ती संघर्ष समितीने आजरा - भुदरगडच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांना दिले. अँग्लो उर्दू हायस्कूल आणि ज्यू. कॉलेजच्या कारभाराची चौकशी व्हावी, गैरव्यवहार, बनावट रेकॉर्ड व कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा. संस्थेतील शिक्षक नियुक्तीबाबत झालेला भ्रष्टाचार संपलाच पाहिजे, यासह निवेदनातील १७ मागण्यांची शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून कायदेशीरदृष्ट्या तत्परतेने कार्यवाही वहावी यासाठी मोर्चा होत आहे. मुक्ती संघर्षचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, पंचायत समितीचे माजी सदस्य बशीर खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते अबुसईद माणगावकर, संघटक समीर खेडेकर उपस्थित होते. निवेदनावर पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.