पोलिस-वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस-वृत्त
पोलिस-वृत्त

पोलिस-वृत्त

sakal_logo
By

कं‍टेनरची बैलगाडीला धडक,
बाप-लेक गंभीर जखमी
कोल्हापूर ः उचगाव (ता. करवीर) येथील पुलानजीक कं‍टेनरने बैलगाडीला पाठीमागून दिलेल्‍या धडकेत बैलगाडीतील बाप-लेक गंभीर जखमी झाले. जयसिंग यशवंत रेडेकर (वय ६५) व प्रदीप जयसिंग रेडेकर (४०, दोघे रा. रेडेकर गल्‍ली, उचगाव) अशी जखमींची नावे आहे. या धडकेत बैलालाही दुखापत झाली आहे. रेडेकर बाप-लेक शेतातील कामे आटोपून घरी चालले होते. घरापासून काही अंतरावर असतानाच पाठीमागून कं‍टेनरने बैलगाडीला जोराची धडक दिली. जयसिंग रेडेकर व प्रदीप रेडेकर बैलगाडीतून खाली पडल्‍याने दोघांच्‍याही डोक्‍याला गंभीर इजा झाली आहे. दोघांवर ‘सीपीआर’मध्‍ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्‍णालयात हलविण्‍यात आले. याबाबत गांधीनगर पोलिसांत गुन्‍हा दाखल झाला.
.............

टेंबलाईवाडीत तरुणास मारहाण
कोल्हापूर : टेंबलाईवाडी विक्रमनगर परिसरात काल (गुरुवारी) मध्‍यरात्री झालेल्‍या मारहाणीत सौरभ पांडुरंग गोंधळे (वय २२, रा. उचगाव) हा तरुण जखमी झाला. त्‍याला उपचारासाठी ‘सीपीआर’मध्‍ये दाखल केले आहे. याबाबतची नोंद राजारामपुरी पोलिसांत झाली.
...............
येलूर फाट्यानजीक
अपघातात एकाचा मृत्‍यू
कोल्हापूर : पुणे-बंगळूर मार्गावरील येलूर (ता. वाळवा) फाट्याजनीक अपघातात जखमी झालेले गणपती शामराव जाधव (वय ५५, रा. गायकवाड गल्‍ली, येलूर) यांचा मृत्‍यू झाला. आज सकाळी साडेनऊच्‍या सुमारास झालेल्या अपघातानंतर त्‍यांना उपचारासाठी ‘सीपीआर’मध्‍ये आणले, मात्र उपचारापूर्वी वाटेतच त्‍यांचा मृत्‍यू झाला. याबाबतची नोंद ‘सीपीआर’ पोलिस चौकीत झाली.
...........
सराव करताना महिला कुस्‍तीपटू जखमी
कोल्‍हापूर : कोलोली (ता. पन्‍हाळा) येथील कुस्‍ती संकुलात सराव करताना वेदिका संदीप माने (वय ११, रा. मानेवाडी, कोलोली) ही कुस्‍तीपटू जखमी झाली. सरावादरम्‍यान तोंडावर पडल्‍याने जखमी अवस्‍थेत तिला उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल करण्‍यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
............
रंकाळा परिसरातून
तीन तोळे दागिने चोरीस
कोल्हापूर : रंकाळ्यानजीक मीरा भक्‍ती इमारतीतील फ्‍लॅटमधून तीन तोळे वजनाचे सोन्‍याचे दागिने व रोख बावीस हजार असा सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याबाबत माया बंडाजी मगदूम (वय ४५) यांनी लक्ष्‍मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. संशयित चोरट्याने मगदूम यांच्‍या फ्‍लॅटमधून २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी कालावधीत वेगवेगळ्यावेळी दागिने व रक्‍कम पळवली. त्यामध्‍ये एक तोळ्याची सोनसाखळी, अर्धा तोळ्याची अंगठी, अर्धा तोळ्याच्‍या कानातील रिंगा तसेच रोख २२ हजार असा ऐवज चोरीस गेला आहे.
............
दीड लाखांच्‍या दागिन्यांवर डल्‍ला
कोल्हापूर ः पाचगाव परिसरातील महालक्ष्‍मी पार्क येथील प्रसादाच्‍या कार्यक्रमातून १ लाख ४० हजार किमतीचे दागिने चोरट्याने पळवले. संध्‍या मनीषकुमार देवडकर (वय ४०) यांनी याबाबत करवीर पोलिसांत फिर्याद दिली. २९ जानेवारीला देवडकर यांच्‍या ‍घरी प्रसादाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्‍यान चोरट्याने दोन मंगळसूत्र, कानातील रिंगा अशा ऐवजावर डल्‍ला मारला.
..............
आईच्या अपघाती मृत्यूप्रकरणी मुलावर गुन्‍हा
कोल्‍हापूर : बिंदू चौक सबजेलनजीक पाण्‍याच्‍या टँकरखाली सापडून झालेल्‍या रेखा शहा यांच्‍या मृत्‍यूप्रकरणी मुलगा मेहुलकुमार अभिनंदन शहा (वय २४, रा. कसबा गेट, महाद्वार रोड) याच्‍यावर गुन्‍हा दाखल झाला. रविवारी (ता. ५) सकाळी साडेनऊच्‍या सुमारास हा अपघात घडला होता.
मेहुलकुमार हा त्‍याची आई रेखा शहा यांना दुचाकीवरून घेऊन करवीरनगर वाचन मंदिरकडून बिंदू चौकाकडे निघाला होता. त्‍यांच्‍यासमोरील पाण्‍याच्‍या टँकरला उजव्‍या बाजूने चुकीच्‍या दिशेने ओव्‍हरटेक करताना त्‍याचा ताबा सुटून दुचाकीवरून रेखा शहा कोसळल्‍या. या वेळी बाजूला असणाऱ्या टँकरखाली आल्‍याने रेखा शहा यांचा जागीच मृत्‍यू झाला होता.
............