Wed, March 22, 2023

मुख्यमंत्री, पालकमंत्री आज कणेरीमठाला भेट देणार
मुख्यमंत्री, पालकमंत्री आज कणेरीमठाला भेट देणार
Published on : 10 February 2023, 4:57 am
मुख्यमंत्री आज
कणेरी मठाला भेट देणार
कोल्हापूर, ता. १० ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री दीपक केसरकर उद्या (शनिवारी) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवानिमित्ताने ते कणेरीमठाला भेट देणार आहेत. ते दुपारी एक वाजता कोल्हापूर विमानतळावर येतील. तेथून दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी कणेरीमठ येथे पोहचतील. तेथे ते सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे सायंकाळी साडेपाचला विमानाने मुंबईला रवाना होणार आहेत.