तरुणांची हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांची हाणामारी
तरुणांची हाणामारी

तरुणांची हाणामारी

sakal_logo
By

युवकांच्या दोन गटांत
कोयता, रॉडने हाणामारी

गडहिंग्लजचे तिघे जखमी; हनिमनाळच्या ५ तरुणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. १० : शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या १८ ते १९ वयोगटातील तरुणांच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. मारहाणीसाठी कोयता, रॉड आणि लोखंडी कड्याचा वापर झाला. गुरुवारी (ता. ९) सकाळी अकराच्या सुमारास डॉक्टर कॉलनीतील साई उद्यानासमोर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
या मारहाणीत विवेक धुरे, कुणाल पुजारी, धनंजय पाटील (सर्व रा. गडहिंग्लज) जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी ऋतुराज सुतार, प्रथमेश कुंभार, यश परीट, आशिष पाटील, ओमकार कापसे (रा. हनिमनाळ, ता. गडहिंग्लज) यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, जखमी व संशयित एकाच महाविद्यालयात शिकत आहेत. बुधवारी (ता. ८) धुरे याचा मित्र अंकुर लोखंडेला (धामणे, ता. आजरा) येथील बसस्थानकात वरील संशयितांनी मारहाण केली होती. त्यानंतर गुरुवारी धुरे, पुजारी व पाटील यांनी या संशयितांकडे जावून अंकुरला विनाकारण मारहाण का केली, अशी विचारणा केली. तेंव्हा संशयितांनी जमाव जमवून धुरे व त्याच्या मित्रांना शिवीगाळ केली. तसेच यावेळी अंकुरला मारहाणही सुरु केली. तेव्हा अंकुरला सोडवून घेण्यास गेले असता ऋतूराजने धुरे याच्या डोकीत व डाव्या खांद्यावर कोयत्याने मारले. ओमकारने हातातील लोखंडी कड्याने कुणालच्या डोकीत तर यश याने लोखंडी रॉडने धनंजयच्या डोकीत मारून जखमी केले. या तिघांवरही उपजिल्हा रुग्णालयात उपचार झाले. याबद्दल विवेक धुरे याने पोलिसांत फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार रवी शिंदे करीत आहेत.