तरूणावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरूणावर गुन्हा
तरूणावर गुन्हा

तरूणावर गुन्हा

sakal_logo
By

लग्नाचे आमिष दाखवून
फसवणूक, तरुणावर गुन्हा

कोल्हापूर, ता. १० : शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर आज शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. प्रशांत भास्कर कांबळे (वय ३३, रा. पाडळी, ता. करवीर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने लग्नाचे आमिष दाखवून चाळीस वर्षीय महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे व पीडित महिला यांच्यात २०१९ मध्ये ओळख झाली. त्यातून दोघांत शारीरिक संबंध निर्माण झाले. संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने त्याला लग्न कधी करायचे असे विचारल्यावर मात्र त्याने लग्नास नकार दिला. घरी भांडणे सुरू असून, आताच लग्नाचे काय चाललेय, असे सुनावले. तसेच तिच्याशी वाद घालून मारहाण व शिवीगाळ केली. त्यानंतर तुला काय करायचे ते कर, मला तुझ्याशी लग्न करायचे नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडितेने त्याच्याविरोधात फिर्याद दिली.